आम आदमी पक्षाचे आमदार अनिल वाजपेयी यांचा भाजपात प्रवेश, अरविंद केजरीवाल यांना मोठा धक्का

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 3 मे 2019

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील आम आदमी पक्षाचे आमदार अनिल वाजपेयी यांनी आज (शुक्रवार) भाजपमध्ये प्रवेश केला. वाजपेयी यांच्या भाजपप्रवेशाने दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांना मोठा धक्का बसला आहे. 

अनिल वाजपेयी यांनी भाजपचे उपाध्यक्ष आणि दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष श्याम जाजू आणि केंद्रीय मंत्री विजय गोयल यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी वाजपेयी म्हणाले, ''मागील 15 वर्षांपासून मी आम आदमी पक्षासाठी काम करत आलो आहे. मात्र, पक्षात मला अपेक्षित सन्मान, आदर केला जात नव्हता. आम आदमी हा पक्ष एक मार्ग भरकटलेला पक्ष आहे''.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर घोडेबाजाराचा आरोप केला होता. यामध्ये त्यांनी भाजपकडून दुसऱ्या पक्षांतील आमदार फोडण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप केला होता. 

Web Title: Delhi AAP MLA Anil Bajpai Joins BJP

संबंधित बातम्या

Saam TV Live