#JNU हिंसाचारावर 'तान्हाजी' अजय म्हणाला...

Ajay Devgan speaks on JNU attack, JNU Attack
Ajay Devgan speaks on JNU attack, JNU Attack

नवी दिल्ली : जेएनयुमधील विद्यार्थ्यांच्या मारहाण प्रकरणाचा देशभरातून विरोध होतोय. बॉलिवूड कलाकारांनीही या हिंसाचारावर नाराजी व्यक्त केली आहे. सध्या 'तानाजी'च्या प्रमोशनमध्ये बिझी असलेला मात्र सामाजिक भान असलेल्या अजय देवगणनेही जेएनयू प्रकरणावर आपलं मत व्यक्त केलंय. काय म्हणाला अजय?

'जेएनयूमधली हिंसाचार हा अत्यंत दुर्दैवी आहे. कोणत्याही गोष्टीचा उपाय हिंसा नसते. मला विद्यापीठाच्या आवारात नक्की काय घडले याची सविस्तर माहिती नाही, त्यामुळे मी त्यावर जास्त काही बोलून आगीत तेल ओतण्याचे काम करू शकत नाही. जेएनयूमधील प्रकरण हे अत्यंत गोंधळात टाकणारं आहे. नक्की कोणी काय केलंय याची ठोस माहिती अजूनही मिळालेली नाही. ती माहिती स्पष्ट होत नाही तोपर्यंत कोणत्याही गोष्टीबाबत प्रतिक्रिया देणे चूक ठरेल,' असं अजय म्हणाला.

हिंसा हा कोणत्याही मुद्याचा उपाय असू शकत नाही. यामुळेआपल्या देशाचेच नुकसान होते. त्यांचा अजेंडा काय होता हे मला बातम्यांतून स्पष्ट झालेले नाही, तुम्हाला समजला असेल तर मला सांगा असा सवाल त्याने उपस्थितांना केला. एक सेलिब्रिटी म्हणून आमच्यावर जबाबदारी असते, काही तरी मत व्यक्त करून आणखी गोंधळ निर्माण करण्याची माझी इच्छा नाही. कलाकारांच्या वक्तव्याचा बऱ्याचदा वेगळा अर्थ घेतला जातो. त्यामुळे माझ्याकडे सविस्तर माहिती येत नाही, तोपर्यंत मला काही प्रतिक्रिया द्यायचा हक्क नाही, असेही त्याने यावेळी स्पष्ट केले.  

अजय देवगण, काजोल, सैफ अली खान यांची मुख्य भूमिका असलेला 'तानाजी : द अनसंग वॉरियर' हा ऐतिहासिक चित्रपट 10 जानेवारीला रिलीज होतोय. त्यापूर्वी सुरू असलेल्या प्रमोशनमध्ये अजयने आपले मत मांडले. 

Web Title: Ajay Devgan speaks on JNU attack
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com