कोण म्हणतंय? 'हिंदुओं की कब्र खुदेगी'

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 18 डिसेंबर 2019

नवी दिल्ली : नागरिकत्त्व संशोधन विधेयकाचा विरोध करणाऱ्या अलिगड मुस्लिम विश्वविद्यालय (एएमयू) च्या विद्यार्थ्यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये या विद्यार्थ्यांनी हिंदूंविरोधात घोषणाबाजी केल्या. विद्यार्थ्यांच्या या घोषणाबाजीला भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष संतोष रंजन राय विरोध केला. राय यांनी ट्विट करत सांगितले, की एएमयूच्या छातीवर हिंदूंची कबर खोदली जाईल. हेच आता भारतात ऐकायला मिळत आहे.

ट्विटरवर अशा स्वरूपाचा व्हिडिओ पाहिला मिळत आहे. तसेच या व्हिडिओमध्ये विद्यार्थ्यांनी हिंदूंविरोधात घोषणाबाजी केली हे दिसत आहे. हे सर्व चुकीचे आहे. विद्यार्थ्यांकडून हिंदुत्त्व, सावरकर, भाजप, ब्राह्मणवाद आणि जातिवादविरोधात घोषणाबाजी केली जात आहे. 'हिंदुत्त्वाची कबर खोदली जाईल, एएमयूच्या छातीवर. सावरकरांची कबर खोदली जाईल, एएमयूच्या छातीवर. भाजपची कबर खोदली जाईल, एएमयूच्या छातीवर. ब्राह्मणवादाची कबर खोदली जाईल, एएमयूच्या छातीवर. 

12 डिसेंबरला व्हिडिओ झाला पोस्ट

विद्यार्थ्यांनी केलेल्या या घोषणाबाजीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजपचे पदाधिकारी असलेल्या संतोष रंजन राय यांनी यावर आक्षेप घेत याचा व्हिडिओ व्हायरल केला. विद्यार्थ्यांचा हा व्हिडिओ 12 डिसेंबर, 2019 मध्ये पोस्ट करण्यात आला. 

संबंधित बातम्या

Saam TV Live