POK मधील दहशतवाद्यांचे अड्डे खरोखरच बंद झाले आहेत का ?

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 11 जून 2019

नवी दिल्ली: भारताने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर नंतर पाकव्याप्त काश्मीरमधील (पीओके) दहशतवाद्यांचे अड्डे खरोखरच बंद झाले आहेत का? हे तपासून पाहणे अवघड आहे. भारताकडून यापुढेही सीमेवर लक्ष ठेवले जाईल, असे लष्कर प्रमुख बिपिन रावत यांनी आज (सोमवार) म्हटले आहे.

नवी दिल्ली: भारताने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर नंतर पाकव्याप्त काश्मीरमधील (पीओके) दहशतवाद्यांचे अड्डे खरोखरच बंद झाले आहेत का? हे तपासून पाहणे अवघड आहे. भारताकडून यापुढेही सीमेवर लक्ष ठेवले जाईल, असे लष्कर प्रमुख बिपिन रावत यांनी आज (सोमवार) म्हटले आहे.

भारताने दहशतवाद्यांविरोधात केलेल्या कारवाईनंतर पाकिस्तानला जाग आली. दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई करत आहे, असे पाकिस्तानला जगाला सांगत आहे. परंतु, पाकिस्तानकडून खरंच दहशतवाद्यांचे तळ बंद केले जात आहेत का, हे तपासून पाहणे अवघड आहे. पाकिस्तानकडून केला जाणाऱ्या दाव्यावर विश्वास ठेवता येणार नाही, असे रावत यांनी अप्रत्यक्षपणे म्हटले आहे.

रावत म्हणाले, पाकिस्तान जगाला सांगत आहे की, देशाच्या भूमीचा वापर दहशतवादी कृत्यांसाठी करू दिला जात नाही. शिवाय, देशातून दहशतवादी कारवाया केल्या जात नाहीत. पाकिस्तानने दहशतवादी तळ बंद केल्याचा दावाही केला आहे. भारत आणि अमेरिकेकडून दबाव आल्यानंतर पाकिस्तानने अनेकदा असे दावे केले आहेत. परंतु, पाकिस्तानच्या वक्तव्यांवर विश्वास ठेवता येणार नाही. कारण त्यांनी खरोखरच हे अड्डे बंद केले आहेत का हे तपासून पाहणे अवघड आहे. भारत यापुढेही सीमेवर लक्ष ठेवणार आहे.'

'पाकिस्तानात एक-दोन दहशतवादी तळ नाहीत तर दहशतवाद्यांसाठी अनेक तळ उभारले आहेत. या ठिकाणी दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. त्यानंतर त्यांना कारवाया करण्यासाठी काश्मीरमध्ये पाठवण्यात येते,' असेही रावत म्हणाले.

दरम्यान, भारताकडून बालाकोटसारखी कारवाईची भिती आणि आंतरराष्ट्रीय दबाव यामुळे पाकिस्तानने गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या भूमीवरील दहशतवादी तळ बंद केले आहेत. पाकिस्तानी लष्कराच्या पाठिंब्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादी तळ सुरु असल्याचे पुरावे भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर सादर केले. भारताने अशा प्रकारे दबाव आणल्यानंतर पाकिस्तानने हे पाऊल उचलले आहे. मुझफ्फराबाद आणि कोटलीमध्ये प्रत्येकी पाच आणि बर्नालामध्ये एक असे 11 दहशतवादी तळ पीओकेमध्ये सुरु असल्याचे पुरावे भारताने सादर केले. सुंदरबनी आणि राजौरीच्या विरुद्ध दिशेला कोटली, निकियल भागात सुरु असलेले दहशतवादी तळ बंद झाले आहेत. लष्कर-ए-तय्यबाकडून हे तळ चालवले जात होते. पाला आणि बाघ भागात जैश-ए-मोहम्मदकडून चालवले जाणारे तळही बंद झाले आहेत.

गुप्तचर यंत्रणांच्या अहवालानुसार मुझफ्फराबाद आणि मीरपूरजवळ असलेले दहशतवादी तळही बंद झाले आहेत. लष्कर-ए-तय्यबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिद्दीनचे हे तळ तात्पुरते बंद झाले आहेत. एलओसीजवळ असलेले दहशतवाद्याचे लाँचपॅडही बंद झाले आहेत. भारतात घुसखोरी करण्यासाठी या लाँचपॅडचा वापर होतो. बालाकोट एअर स्ट्राइकनंतर पीओकेमधून घुसखोरीचा प्रयत्न झालेला नाही. पाकिस्तानने सीमेवरील तणावही कमी करण्याची विनंती केली आहे.

Web Title: Did Pakistan shut down terror camps in PoK? Army chief Bipin Rawat says no way to verify
 


संबंधित बातम्या

Saam TV Live