काश्मीरप्रश्नी मध्यस्थी हवी की नको हा सर्वस्वी मोदींचा निर्णय - डोनाल्ड ट्रम्प

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019

नवी दिल्ली : काश्मीर प्रश्नी मोदी सरकार व अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात झालेल्या वादांवर आता ट्रम्प यांनी मौन सोडले आहे. काश्मीरप्रश्नी अमेरिकेची मध्यस्थी हवी की नको हा सर्वस्वी मोदींचा निर्णय आहे, असे ट्रम्प यांनी सांगितले. 

काही दिवसांपूर्वीचे ट्रम्प यांचे वक्तव्य भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने खोडून काढले होते. पंतप्रधान मोदी यांनी मला काश्मीरप्रश्नी मध्यस्थीसाठी मला विनंती केली होती असं वक्तव्य डोनाल्ड ट्रम्प यांनी केले होते. त्यानंतर आता याच संदर्भात ट्रम्प यांचे नवे वक्तव्य समोर आलं आहे.

काश्मीरवर तोडगा निघण्यासाठी भारत-पाकमध्ये चर्चा व्हायला हवी. मी या प्रश्नात मध्यस्थी करायची की नाही हा मोदींचा निर्णय आहे, असे आता ट्रम्प यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान मोदी व इम्रान खान दोन्ही माणसे चांगली आहेत. त्यांच्यात काश्मीर प्रश्न भडकतो आहे. याबाबत मी भारताशी म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याशी चर्चा केली. मात्र या दोघांनी चर्चा करण्याची गरज आहे असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे.

Web Title: Donald trump says It Is Really Up To Pm Modi that i have look into kashmir dispute

संबंधित बातम्या

Saam TV Live