अखेर एकनाथ खडसेंचा मार्ग ठरला- सूत्र

Sharad Pawar, Eknath Khadse
Sharad Pawar, Eknath Khadse

मुंबई : भाजप नेते एकनाथ खडसेंचा मार्ग ठरल्याची माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिलीय. एकनाथ ख़डसे शिवसेनेत जाण्याची शक्यता वर्तवली जाते...शिवसेनेने एकनाथ खडसे यांना पक्षात घेता येईल का यासाठी हालचालीही सुरू केल्यात...राज्यात शिवसेनेने भाजपला सत्तेपासून चार हात लांब ठेवत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन केलं..आता विरोधी पक्षात बसलेला भाजप सरकारवर आणि प्रामुख्याने शिवसेनेवर तुटून पडणार याची कल्पना असल्याने शिवसेनेने एकनाथ खडसे यांना पक्षात घेण्याबाबत हालचाली सुरू केल्यात. यासाठी खडसे यांच्याशी संपर्क साधण्याची जबादारीही काही नेत्यांवर देण्यात आल्याचे कळतंय. काल एकनाथ खडसे शरद पवारांना भेटले. आज ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेणारेत. तसंच आज भाजपच्या कोअर कमिटीचीही बैठक होणारे. या सगळ्या राजकीय घडामोडींवर आज आपलं विशेष लक्ष असणारे. 

भारतीय जनता पक्षाचे नेते एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या दिल्लीतील ६ जनपथ निवासस्थानी पोहोचले होते. मागच्या आठवड्यात मला वेगळा विचार करावा लागेल असा इशारा खडसेंनी दिल्यावर ते पवारांच्या भेटीला गेल्याने चर्चांना उधाण आले. खडसे खरोखरच वेगळी भूमिका घेणार आहेत यावर आता शिक्कामोर्तब झालाय.

खडसे भाजपमध्ये नाराज असून वेळोवेळी त्यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली आहे. खडसे हे भाजप नेत्यांच्या भेटीसाठी दिल्लीत गेल्याची चर्चा होती. पण, त्याऐवजी ते शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. भाजपमध्ये बहुजन समाजाला डावलण्याचा प्रयत्न होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. पंकजा मुंडे आणि रोहिणी खडसे यांचा पराभव पक्षातील लोकांमुळेच झाला असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. कोणी पक्षविरोधात कामे केलेल्यांची नावे आपण वरिष्ठांकडे दिली असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

पक्षाच्या निर्णय प्रक्रियेपासून मला जाणीवपूर्वक दूर करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. माझा पक्ष सोडण्याचा अद्यापही विचार नाही. परंतु, असेच चालू राहिले तर मला वेगळा विचार करावाच लागेल असा इशारा त्यांनी भाजपला दिला होता. पक्ष उभारणीसाठी मी मेहनत घेतली. परंतु, आता महत्वाच्या काळात पक्ष सोबत नसल्याची खंतही त्यांनी बोलून दाखविली होती.

Web Title: Bjp Leader Eknath Khadse Meets Ncp Chief Sharad Pawar At Delhi Residence

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com