काश्मीरमधील ३५-अ रद्द होणार ?

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने आपल्या खासदारांना सात तारखेपर्यत व्हिप जारी केला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी संसदीय सुरक्षा समितीची बैठक सुरू झाली आहे. या बैठकीनंतर कॅबिनेटची बैठक होणार आहे. 

काश्मीरातील तगडा सुरक्षा बंदोबस्त पाहता कलम ३५-अ रद्द करण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. दरम्यान काँग्रेसने लोकसभेत या विषयावर चर्चा होण्यासाठी स्थगन प्रस्ताव दिला आहे. मोदी सरकार आज काश्मीरबाबत मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलामनबी आझाद यांनी ही लोकशाहीची हत्या असल्याचे म्हटले आहे.

उमर, मेहबूबा मुफ्ती नजरकैदेमध्ये 
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत जम्मू- काश्‍मीर संदर्भात मोठा निर्णय होण्याची शक्‍यता आहे. त्याच अनुषंगाने श्रीनगरमध्ये कलम 144 लागू केले आहे. माजी मुख्यमंत्री आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्या मुफ्ती मेहबूबा, नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे अध्यक्ष उमर अब्दुल्ला यांना नजरकैदेत ठेवले आहे. जम्मू भागात 30 हजार जवान तैनात केले असून, श्रीनगर विद्यापीठाच्या परीक्षा स्थगित केल्या आहेत. तत्पूर्वी फारुख अब्दुल्ला यांच्या निवासस्थानी सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली.

Web Title: Jammu & Kashmir special status Decoding Article 35A and Article 370

संबंधित बातम्या

Saam TV Live