''काश्मिरी जनतेने दहशतीवर विकासाने मात केली'' - नरेंद्र मोदी

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 28 जुलै 2019

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आकाशवाणीच्या मन की बात कार्यक्रमात जम्मू-काश्मीरमध्ये अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांशी राबवलेली बॅक टू व्हिलेज म्हणजेच गावाकडे चला ही मोहीम आणि तिचे यश यांचा उल्लेख करून " बॉम्ब आणि बंदुकांच्या जोरावर पसरवू पाहणाऱ्यांना काश्मिरी जनतेने विकासाच्या साठी दिलेले हे प्रत्युत्तर असून  दहशतीवर विकासाने मात केली,'' असे सांगितले. चांद्रयान-2 मोहिमेनंतर  विद्यार्थ्यांसाठी सरकार राष्ट्रीय पातळीवर प्रश्नमंजुषा स्पर्धा घेणार असल्याची घोषणा त्यांनी केली.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आकाशवाणीच्या मन की बात कार्यक्रमात जम्मू-काश्मीरमध्ये अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांशी राबवलेली बॅक टू व्हिलेज म्हणजेच गावाकडे चला ही मोहीम आणि तिचे यश यांचा उल्लेख करून " बॉम्ब आणि बंदुकांच्या जोरावर पसरवू पाहणाऱ्यांना काश्मिरी जनतेने विकासाच्या साठी दिलेले हे प्रत्युत्तर असून  दहशतीवर विकासाने मात केली,'' असे सांगितले. चांद्रयान-2 मोहिमेनंतर  विद्यार्थ्यांसाठी सरकार राष्ट्रीय पातळीवर प्रश्नमंजुषा स्पर्धा घेणार असल्याची घोषणा त्यांनी केली.

मोदींनी लोकसभा निवडणुकीतील त्यानंतर मन की बात का सिलसिला पुन्हा सुरू केला असून हा या साखळीतला दुसरा कार्यक्रम होता. काश्मीरच्या शोपिया जिल्ह्यातील मोहम्मद अस्लम यांनी माय जिओ व्ही वर बॅक टू व्हिलेज आणि त्याच्या यशाची माहिती दिली होती. पंतप्रधानांनी वर्णन करून काश्मिरी जनता दहशतीच्या नव्हे तर विकासाच्या बरोबर असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित केले. काश्मीरला खास दर्जा देणारे कलम 370 रद्द करण्याच्या संदर्भातील एक महत्त्वाकांक्षी विधेयक लोकसभेच्या दरवाजावर आले आहे, त्या पार्श्‍वभूमीवरही पंतप्रधानांनी यासाठी आजच्या संबोधनातील पाच मिनिटे देणे लक्षयीय मानले जाते.

पाच वर्षांपूर्वी आपल्या सरकारने सुरू केलेली स्वच्छता मोहीम सुंदरतेकडे चालली आहे हे सांगताना पंतप्रधानांनी राजधानीच्या विविध भागांमध्ये तसेच कुंभमेळ्यातही स्वच्छतेच्या आणि पथकलेच्या माध्यमातून कार्य करणारे योगेश सैनी उदाहरण दिलं.
जलसंधारण हे मी सांगण्याआधीच सामान्य लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय बदलल्याचं सांगताना पंतप्रधानांनी प्रसारमाध्यम आणि स्वयंसेवी संस्था जलसंवर्धनासाठी मोहिमा चालवल्या हे सामर्थ्य आनंददायी असल्याचं सांगितलं. सणासुदीच्या आगामी काळामध्ये येणाऱ्या जत्रा यात्रा पथनाट्य प्रदर्शन भाषण पाणी वाचवा मोहिमेला बळ द्यावं असे आवाहन त्यांनी केलं. मॉस्कोत नुकत्याच झालेल्या खास क्रीडा स्पर्धेचा त्यांनी उल्लेख केला कर्करोगावर मात करणाऱ्या कार्टून साठी झालेल्या या स्पर्धेत विजय मिळवलेल्या मनीष जोशी हर्ष देवधर अथर्व देशमुख निधी बायको टू हा भारतीय मुलांचं त्यांनी अभिनंदन केलं.

चांद्रयान-2 मोहिमेचे यश हे अनेकानेक अर्थांनी प्रेरणादायी असल्याचे सांगताना पंतप्रधान म्हणाले की अखेरच्या टप्प्यात आलेल्या संकटावर वैज्ञानिकांनी ज्या सामर्थ्याने मात केली विश्वास आणि निर्भयता हे दोन गुण आयुष्यातही किती उपयोगी पडू शकतात हा धडा चांद्रयान-2 नॆ दीला. आपल्या जीवनातही अनेक अडचणी येतात त्यातून बाहेर पडण्याचे सामर्थ्य आपल्यातच असतं हे भारतीय वैज्ञानिकांनी या संपूर्ण स्वदेशी मोहिमेद्वारे डीलर गौरवोद्गार काढले. श्रावण महिन्यात विविध सणांची रेलचेल असते त्यांनी प्रख्यात कवी दरा बेंद्रे यांच्या च्या कवितेच्या ओळी उद्धृत केल्या.

विद्यार्थ्यांसाठी चांद्रयान स्पर्धा
चंद्रयान 2 मोहिमेच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय पातळीवरील प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात येणार असल्याची घोषणा एक ऑगस्ट रोजी माय जीओव्ही संकेतस्थळावर या स्पर्धेचे तपशील जाहीर होणार आहेत या स्पर्धेत राज्यांमध्ये अव्वल येणाऱ्या विद्यार्थ्यांना एक खास संधी मिळणार आहे असे सांगून पंतप्रधान म्हणाले की चंद्रयान 2 सप्टेंबर मध्ये जेव्हा चंद्रावर प्रत्यक्ष उतरेल त्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार म्हणून विजयी विद्यार्थ्यांना श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ संशोधन केंद्रावर नेण्यात येणार आहे.

Web Title: Mann Ki Baat Development powerful than terror says PM Narendra Modi on Kashmir


संबंधित बातम्या

Saam TV Live