'टायगर जिंदा है म्हणून चालणार नाही, तर त्याचे संवर्धन करणे गरजेचे आहे - मोदी

'टायगर जिंदा है म्हणून चालणार नाही, तर त्याचे संवर्धन करणे गरजेचे आहे - मोदी

नवी दिल्ली : 'टायगर जिंदा है म्हणून चालणार नाही, तर त्याचे संवर्धन करणे गरजेचे आहे. भारतातील वाघांची घटती संख्या ही अत्यंत चिंताजनक आहे,' असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनाच्या कार्यक्रमात व्यक्त केले. 

'आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनी' नवी दिल्ली येथे 'मॅनेजमेंट इफेक्टिव्हनेस अॅण्ड इव्हॅल्युएशन ऑफ टायगर रिझर्व्हस' या सरकारी अहवालाचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकरही उपस्थित होते. 'देशात या घडीला फक्त 3 हजार वाघ आहेत. वाघांबरोबरच देशात अभयारणयांची संख्या वाढणे आणि पर्यावरणाचा शाश्वत विकास होणे गरजेचे आहे. वाघांच्या घटत्या संख्येचा परिणाम हा पर्यटन व रोजगारावर होत आहे,' असेही मोदींनी यावेळी सांगितले.  

बायोफ्युएलचे प्रकल्प, स्मार्ट सिटी योजना, अपारंपारिक उर्जा प्रकल्प या सगळ्यामध्ये शाश्वत पर्यावरणाचा विचार केला जात आहे. तसेच 2020 पर्यंत भारताला सौर उर्जेने जोडण्याचे ध्येय या सरकारने हाती घेतले आहे, अशीही माहिती त्यांनी यावेळी दिली.     

Web Title: Narendra Modi speaks at International tiger day program day at Delhi

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com