पाकिस्तानचे रणगाडे सीमेवर तैनात ,पाक अद्यापही घाबरलेले

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 14 मे 2019

नवी दिल्लीः भारतीय हवाई दलाने बालाकोट येथे केलेल्या हवाई हल्ल्याला दोन महिने उलटून गेले असून, पाकिस्तान अद्यापही त्यामधून सावलेले नाही. पाकिस्तानने शकरगडमध्ये तब्बल 300 रणगाडे तैनात केले आहेत.

नवी दिल्लीः भारतीय हवाई दलाने बालाकोट येथे केलेल्या हवाई हल्ल्याला दोन महिने उलटून गेले असून, पाकिस्तान अद्यापही त्यामधून सावलेले नाही. पाकिस्तानने शकरगडमध्ये तब्बल 300 रणगाडे तैनात केले आहेत.

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 40 जवान हुतात्मा झाले होते. या घटनेनंतर भारताने बालाकोट येथे हवाई हल्ला केला होता. भारताकडून हल्ला होईल या भितीने पाकिस्तानने सीमेवर मोठ्या प्रमाणात रणगाडे व सैन्य तैनात केले होते. दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्यासाठी भारताने सैन्य मागे घेतले आहे. मात्र, पाकिस्तान अद्यापही घाबरलेल्या अवस्थेत आहे. पाकिस्तानने सीमेवरील सैन्य अद्याप मागे घेतलेले नाही. यामध्ये बख्तरबंद ब्रिगेड, 125 बख्तरबंद ब्रिगेड आणि 8-15 डिव्हिजन तैनात केल्या आहेत.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, 'पाकिस्तानच्या सीमेवरील सैन्याला एक स्वतंत्र बख्तरबंद ब्रिगेड साथ देत आहे. या अहवालामध्ये सरकारी सुत्रांचा हवाला देण्यात आला आहे. हे सैन्य आक्रमक हल्ल्यांसाठी तयार करण्यात आलेले आहे. पुलवामा हल्ल्यानंतर हे सैन्य तैनात करण्यात आले आहे. पाकिस्तानने आक्रमक दल 1 आणि दोन या पथकांना माघारी बोलावले नाही, यामुळे शकरगडमध्येही तैनात केलेले रणगाड्यांवरून पाकिस्तान अद्यापही घाबरलेल्या अवस्थेत असल्याचे दिसते.'

Web Title: Pakistan Army still on alert as 300 tanks remain deployed in Shakargarh sector


संबंधित बातम्या

Saam TV Live