'मैं भी चौकीदार..' मोदींची नवी मोहीम; राहुल गांधींच्या 'चौकीदार चोर है' वर मोदींचं प्रत्युत्तर

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 16 मार्च 2019

नवी दिल्ली : यंदाची लोकसभा निवडणूक 'चौकीदार' या शब्दाभोवती फिरणार असल्याचे आज (शनिवार) जवळपास स्पष्ट झाले आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या 'चौकीदार चोर है' या मोहिमेला प्रत्युत्तर म्हणून भारतीय जनता पक्षाने (भाजप) यंदा 'मैं भी चौकीदार' अशी मोहीम सुरू केली आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच या मोहिमेस सुरवात केली आहे. 

'तुमचा चौकीदार खंबीरपणे उभा आहे आणि देशाची सेवा करत आहे. पण मी एकटा नाही. भ्रष्टाचार, सामाजिक असमानतेविरोधात लढणारा प्रत्येक जण चौकीदारच आहे.. भारताच्या प्रगतीसाठी झटणारा प्रत्येकजण चौकीदार आहे', असे पंतप्रधान मोदी म्हणाले. 

आतापर्यंतच्या अनेक जाहीर सभांमध्ये पंतप्रधान मोदी यांनी स्वत:चा उल्लेख 'देशाचा चौकीदार' असा करतात. राफेल लढाऊ विमानांच्या खरेदीतील कथित गैरव्यवहारावरून काँग्रेसने 'चौकीदार चोर है' अशा शब्दांत टीका केली. राहुल गांधी प्रत्येक सभेमध्ये 'चौकीदार चोर है'च्या घोषणा देतात. या मोहिमेला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपने ही नवी मोहीम सुरू केली आहे. 

विशेष म्हणजे, 2014 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीही भाजपने काँग्रेसच्या नेत्यांच्या टीकेला प्रत्युत्तर देत मोठी मोहीम सुरू केली होती. त्यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी मोदी यांचा उल्लेख 'चहावाला' असा केला होता. त्यावरून भाजपने जोरदार मोहीम चालविली होती. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपच्या व्यूहरचनाकारांनी काँग्रेसच्या 'चौकीदार चोर है'संदर्भात तपशीलवार अभ्यास केला आहे. त्यानुसार, राहुल गांधींच्या या घोषणेचा जनतेवर फारसा परिणाम होत नाही; उलट त्याबद्दल रागच निर्माण होत आहे. त्यामुळे ही संधी साधण्यासाठी भाजपने 'मै भी चौकीदार' असा सूर लावण्याचा निर्णय घेतला आहे. 

Web Title: PM Modi launches pre poll campaign with Main Bhi Chowkidar

संबंधित बातम्या

Saam TV Live