काश्मीर प्रश्नावर मोदींनी माझ्याकडे मदत मागितली - डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा भारताने फेटाळला

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 23 जुलै 2019

नवी दिल्ली : काश्मीरप्रश्नी मध्यस्थी करण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद मोदी यांनी मदत मागितल्याचा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेला दावा भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने फेटाळून लावला आहे. तसेच काश्मीर प्रश्नासह भारत आणि पाकिस्तानमधील अन्य विवादांवर द्विपक्षीय चर्चेतूनच तोडगा काढला गेला पाहिजे, या आपल्या जुन्या भूमिकेचाही परराष्ट्र मंत्रालयाकडून पुनरुच्चार केला आहे.  

नरेंद्र मोदी आणि माझे चांगले संबंध आहेत, काश्मीर प्रश्नावर मोदींनी माझ्याकडे मदत मागितली होती. मलादेखील भारत आणि पाकिस्तानमधील या मुद्द्यावर मध्यस्थी करण्यास आवडेल, असा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. मात्र ट्रम्प यांचा हा दावा भारताने स्पष्ट शब्दात फेटाळला आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प खोटे बोलले आहेत हीच बाब स्पष्ट होते आहे.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रविश कुमार यांनी ट्विट करून म्हटले आहे, डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रसारमाध्यमांकडे केलेले वक्तव्य आम्ही पाहिले आहे. त्यात त्यांनी भारत आणि पाकिस्तानने विनंती केल्यास आपण काश्मीर प्रश्नावर मध्यस्थी करण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. मात्र भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या अध्यक्षांना अशाप्रकारची कुठलीही विनंती केलेली नाही. पाकिस्तानसोबत दीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या सर्व मुद्द्यांवर केवळ द्विपक्षीय चर्चेतूनच तोडगा काढला गेला पाहिजे, अशी भारताचे नेहमीच भूमिका राहिली आहे. तसेच पारिस्तानसोबत कुठलीही चर्चा करण्याआधी सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादी कारवाया थांबल्या पाहिजेत. भारत आणि पाकिस्तानमध्ये सर्व मुद्द्यांबाबत द्विपक्षीय तोडगा काढण्यासाठी शिमला करार आणि लाहोर जाहीरनाम्याच्या आधारावर होईल. 

Web Title: PM Narendra Modi Did Not Ask Donald Trump To Mediate On Kashmir India Counters US President

संबंधित बातम्या

Saam TV Live