मोदीजी, शिवरायांचे हे धोरण शेतकऱ्यांसाठी अवलंबवा - अमोल कोल्हे

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 17 जुलै 2019

नवी दिल्ली : छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांच्या धोरणांसंदर्भात सांगितले होते, की शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका. अशाच उपाययोजना आता आम्हाला या सरकारकडून अपेक्षित आहेत, असे मत शिरूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी लोकसभेत बोलताना व्यक्त केले.

नवी दिल्ली : छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांच्या धोरणांसंदर्भात सांगितले होते, की शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका. अशाच उपाययोजना आता आम्हाला या सरकारकडून अपेक्षित आहेत, असे मत शिरूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी लोकसभेत बोलताना व्यक्त केले.

कोल्हे यांनी लोकसभेत शेतकऱ्यांच्या धोरणासह ग्रामीण रोजगार आणि ग्रामीण पर्यटन या विषयांवरही आपली मते मांडली. शेतकऱ्यांसंदर्भात सरकारने शिवाजी महाराजांच्या धोरणाचा अवलंब करावा अशी मागणी त्यांनी केली. शिवाजी महाराजांच्या वचनाचा दाखला देत केंद्र सरकारनेही शेतकऱ्यांसंदर्भात महाराजांच्या धोरणांच्या आधारावरच ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली.

कोल्हे म्हणाले, की शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात लावू नका असे शिवाजी महाराजांनी सांगितले होते. शेतकऱ्यांसंदर्भात सरकारकडून आम्हाला तशीच अपेक्षा आहे. शेतीसंदर्भातील प्रश्नांवर काहीतरी ठोस उपाययोजना केल्या जाव्या. शेतकऱ्यांची सध्याची परिस्थिती खूपच वाईट आहे. दरवेळी प्रश्न उत्तराच्या तासात शेतीसंदर्भात प्रश्न विचारले जातात तेव्हा दरवेळी शेतकऱ्यांना सहा हजार दिले जातील असेच उत्तर दिले जाते. मात्र आज शेतकऱ्याला दिवसाला 17 रुपये रोजगार मिळतो. हे 17 रुपये म्हणजे त्यांचा सन्मान आणि की चेष्ठा हेच कळत नाही. तसेच सहा हजार वर्षाला दिले तरी 500 रुपये महिना हा हिशेबाने घर चालवता येते का? 500 रुपये महिना दिल्यास शेतीची देखभाल करणे शक्य आहे का?’ एकीकडे आपण पाच ट्रिलीयन अर्थव्यवस्थेच्या गप्पा मारतो. देशाची अर्थव्यस्था पाचव्या क्रमांकावर असेल चौथ्या क्रमांकावर असेल अशा गप्पा आपण मारत असतानाच दुसरीकडे सर्वांत लाजीरवाणी गोष्ट म्हणजे केवळ महाराष्ट्रामध्ये 2015 ते 2018 या काळात एकूण 12 हजार 21 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. म्हणजेच महाराष्ट्रात रोज आठ शेतकरी आमत्महत्या करतायत. त्यामुळे आज शेतकऱ्यांच्या मुलांना आपली अर्थव्यवस्था पाचव्या किंवा चौथ्या स्थानावर आहे असं सांगून मिठाई खायला दिली तर ते माझा बाप परत घेऊन या असे आपल्याला सांगतील.

Web Title: Shirur MP Amol Kolhe criticize government on farmers issue


संबंधित बातम्या

Saam TV Live