बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्याची अमोल कोल्हे यांनी लोकसभेमध्ये अप्रत्यक्ष मागणी

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 18 जुलै 2019

नवी दिल्ली : ग्रामीण रोजगार, पर्यटन यासारख्या मुद्द्यांवर लोकसभेत बोलताना शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी बैलगाडा शर्यतीचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, की बैलगाडा शर्यतीच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय पर्यटकांना ग्रामीण भागाकडे आकर्षित करता येईल. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी शेतकऱ्यांसंदर्भात अनेक प्रश्न लोकसभेमध्ये उपस्थित केले. मंगळवारी लोकसभेमध्ये आपल्या भाषणादरम्यान शेतकरी आत्महत्यांच्या मुद्द्याबरोबरच छत्रपती शिवाजी महाराजांचे धोरण सरकारने अवलंबिण्याची गरज असल्याचे म्हटले.

बैलांवरील अत्याचार रोखण्यासाठी 2014 मध्ये राज्यात बैलगाडा शर्यतींवर बंदी घालण्यात आली. याच मुद्द्यावर कोल्हे यांनी लोकसभेमध्ये बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्याची अप्रत्यक्ष मागणी केली. बैलगाडा शर्यतीच्या माध्यमातून ग्रामीण भागात परदेशी पर्यटकांना आकर्षित करता येईल असं मत कोल्हे यांनी लोकसभेत मांडले. ‘बैलगाडा शर्यतीसाठी लागणारे खिलारी बैलांची पैदास ही दुष्काळग्रस्त क्षेत्रात होते. हे बैल पश्चिम महाराष्ट्रात विकले जातात. त्यामुळे बैलगाडा शर्यतीच्या माध्यमातून राष्ट्रीय नाही तर आंतरराष्ट्रीय पर्यटकांनाही या ग्रामीण भागाकडे आकर्षित करता येईल,’ असे ते म्हणाले.

Web Title: Shirur MP Amol Kolhe talked about bullock cart race in Loksabha

संबंधित बातम्या

Saam TV Live