सर्वोच्च न्यायालयाचा विरोधकांना झटका ; व्हीव्हीपॅटची 50 टक्के मते मोजण्याची मागणी फेटाळली

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 7 मे 2019

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने व्हीव्हीपॅटबद्दल विरोधकांनी दाखल केलेली याचिका फेटाळली असून, 50 टक्के व्हीव्हीपॅटची मते मोजणे शक्य नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने व्हीव्हीपॅटबद्दल विरोधकांनी दाखल केलेली याचिका फेटाळली असून, 50 टक्के व्हीव्हीपॅटची मते मोजणे शक्य नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

यंदा प्रथमच लोकसभा निवडणुकीत ईव्हीएमसोबत व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात आला होता. विरोधी पक्षांनी ईव्हीएमच्या विश्वासार्हतेबद्दल प्रश्न उपस्थित केले होते. 21 विरोधी पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यामध्ये माजी मुख्यमंत्री, विद्यमान मुख्यमंत्री व अनेक पक्षांचे अध्यक्ष सहभागी होती. या याचिकेमध्ये फक्त भाजप सहभागी नव्हते. विरोधकांची याचिका फेटाळल्याने ऐन निकालाच्या तोंडावर विरोधकांना झटका बसला आहे.  

विरोधी पक्षांचे वकील अभिषेक मनू सिंघवी म्हणाले, ईव्हीएममध्ये काही गडबड असल्याने आम्ही ही याचिका दाखल केली होती. आम्ही 50 टक्के मते मोजण्याची मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील 5 विधानसभा मतदारसंघातील ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची मते मोजली जातील असे म्हटले आहे. आम्ही न्यायालयाच्या या निर्णयाचा मान राखतो. 

Web Title: Supreme Court dismissed plea on Opposition parties for VVPAT and EVM


संबंधित बातम्या

Saam TV Live