विराटला BCCI चा दणका; कोहलीला प्रशिक्षक निवडीतून केले बाजूला !

विराटला BCCI चा दणका; कोहलीला प्रशिक्षक निवडीतून केले बाजूला !

नवी दिल्ली : भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा कार्यकाळ संपल्याने आता नव्या प्रशिक्षकपदाचा शोध सुरू झाला आहे. यासंदर्भात बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे. प्रशिक्षकाच्या या निवडीतून कर्णधार विराट कोहलीला बाजूला करण्यात आले आहे. 

त्यामुळे यंदा नवीन कोच निवडताना विराटचे मत आणि त्याची पसंती, नापसंती विचारत घेतली जाणार नाही. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार नव्या कोच निवडीसंदर्भात विराटचे मत विचारात घेतले जाणार नाही अशी माहिती बीसीसीआयच्या सूत्रांनी दिली आहे. 

2017मध्ये जेव्हा रवी शास्त्री यांची नेमणूक झाली होती तेव्हा विराटच्या मताला प्राधान्य देण्यात आल्याचे स्पष्ट दिसले होते. यावेळी मात्र तसे होणार नाही, यावेळी प्रशिक्षकाची निवड केवळ माजी क्रिकेटपटू कपिल देवच करतील आणि त्यानंतर प्रशासकीय समिती यावर शिक्कामोर्तब करेल. 

2017मध्ये अनिल कुंबळे यांना कालावधी न वाढविण्यातही विराटच्या मताला प्राधान्य देण्यात आले होते. त्याने कुंबळेसोबत काम करण्यास नकार दिला होता. 
 
Web Title: Virat Kohli will not have any say in selection of new Coach

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com