प्रचारादरम्यान महिलेने भिरकावली नवज्योतसिंग सिद्धू यांच्यावर चप्पल

प्रचारादरम्यान महिलेने भिरकावली नवज्योतसिंग सिद्धू यांच्यावर चप्पल

नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते व पंजाबचे मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांच्या दिशेने प्रचारादरम्यान एका महिलेने चप्पल फेकल्याची घटना घडली. महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

हरियाणामधील रोहतकमध्ये काँग्रेसचे उमदेवार दिपेंद्र हुड्डा यांच्या प्रचारार्थ नवज्योतसिंग सिद्धू यांची बुधवारी (ता. 8) सभा झाली. या सभेदरम्यान उपस्थितांपैकी कांहीनी 'मोदी.. मोदी..' अशा घोषणा दिल्या. यावेळी एका महिलेने त्यांच्या दिशेने चप्पल फेकली. ही चप्पल व्यासपीठाजवळ येऊन पडली. या घटनेनंतर पोलिसांनी संबंधित महिलेला ताब्यात घेतले आहे.

नवज्योतसिंग सिद्धूंच्या दिशेने चप्पल फेकणाऱ्या महिलेचे नाव जितेंद्र कौर आहे. जितेंद्र कौर हिने आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी तिने असे कृत्य केल्याचे चौकशीदरम्यान पोलिसांनी सांगितले. कौर म्हणाली, 'नवज्योतसिंग सिद्धू यांचे भारतीय जनता पक्षात काही चालले नाही म्हणून त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आधी ते सोनिया गांधी आणि मनमोहनसिंग यांच्यावर टीका करत होते आणि आता नरेंद्र मोदींवर करत आहेत.'

दरम्यान, नवज्योतसिंग सिद्धू हे आटोपून जात असताना काहींनी त्यांना काळे झेंडे दाखविले. शिवाय, 'मोदी.. मोदी..' अशा घोषणा दिल्या. यावेळी झेंडे दाखविणारे आणि काँग्रेसचे कार्यकर्ते यांच्यात बाचाबाची झाली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली.

Web Title: Woman detained for throwing slipper at Navjot Singh Sidhu

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com