मानधनात तफावत; निवडणूक कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 6 मे 2019

लोकसभा निवडणुकीच्या मतदानानंतर मिळणाऱ्या मानधनामध्ये तफावत असल्याने अनेक कर्मचाऱ्यांमध्ये सध्या नाराजी असल्याचे समोर आले आहे.

काही केंद्रप्रमुखांना दोन हजार 50 तर काहींना 1700; तसेच अधिकाऱ्यांपैकी काहींना 1300 आणि 1200 रुपये भत्ता मिळाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. एकाच मतदारसंघात दिल्या जाणाऱ्या या भिन्न भत्त्यांबाबत कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी-1, 2 व 3, शिपाई, पोलिस आणि सूक्ष्म निरीक्षकांची नियुक्ती निवडणूक निर्णय अधिकारी करीत असतात. निवडणुकीच्या कामकाजासाठी नेमणूक केलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना दोन दिवसांच्या प्रशिक्षणासाठी, मतदानपूर्व दिवसासाठी, मतदान दिवसासाठी व एक दिवसाचा आहार भत्ता मिळून एकूण निवडणूक भत्ता दिला जातो.

 कोणाला किती भत्ता द्यावयाचा हे उपजिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी निश्‍चित केलेले असते. त्यानुसार मतदानाच्या दिवशी अनेक ठिकाणी मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांना निवडणूक भत्याचे वाटप मतदान केंद्राध्यक्षामार्फत करण्यात आले आहे.

मात्र अनेक केंद्रावरती मतदान अधिकाऱ्यांना आणि केंद्राध्यक्षांना निवडणूक भत्याची वेगवेगळी रक्कम दिली गेल्याचा तर अनेक ठिकाणी कर्मचाऱ्यांना निवडणूक भत्याचे वाटप केले गेले नसल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. या संदर्भात ते जिल्हाधिकारी ठाणे यांच्याकडे दाद मागणार आहेत.

WebTitle : marathi news navi mumbai election staff unhappy over uneven distribution of allowance

संबंधित बातम्या

Saam TV Live