नवी मुंबई शहरात सीसीटीव्ही लावण्याच्या प्रस्तावाला बहुमताने मंजुरी 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 26 जून 2019

कोणते कॅमेरे लागणार
मुख्य चौकात, रस्त्यावर हाय डेफीनेशन कॅमेरे ९५४, मैदाने व बाजारपेठांच्या देखरेखीकरीता पीटीझेड कॅमेरे ३९६, धावत्या वाहनांची गती देखरेख करण्यासाठी स्पीडिंग कॅमेरे ८०, खाडी व समुद्रकिनारी देखरेखीसाठी थर्मल कॅमेरे ९ असे एकूण एक हजार ४३९ कॅमेरे बसवले जाणार आहेत.

नवी मुंबई - शहरात सीसीटीव्ही लावण्याच्या प्रस्तावाला महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत बहुमताने मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे शहरातील कानाकोपऱ्यात तब्बल एक ४३९ सीसीटीव्ही लावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे; परंतु महापालिका आयुक्त डॉ. एन. रामास्वामी यांनी सीसीटीव्हीचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेच्या पटलावर घेण्यासाठी सादर करून चार महिने उलटल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी हा प्रस्ताव मंजूर केल्यामुळे शिवसेनेतर्फे संशय व्यक्त केला आहे.  

शहरातील रस्ते, प्रमुख चौक, बाजारपेठा, उद्याने, खाडीकिनारे, वाहतूक व्यवस्था आदी बाबींवर लक्ष ठेवण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. एन. रामास्वामी यांनी तब्बल एक हजार ४३९ कॅमेरे बसवण्याचा प्रस्ताव तयार केला होता. हे कॅमेरे बसवण्यासाठी १५४ कोटी रुपये खर्च येणार आहे. 

या प्रस्तावावर चर्चा करताना शिवसेनेचे नगरसेवक किशोर पाटकर यांनी सीसीटीव्हीचा सुधारित प्रस्ताव सादर करण्याची मागणी सभागृहात केली. महापालिकेने प्रस्तावात सादर केलेले सीसीटीव्ही कॅमेरेच्या दराबाबतही पाटकर यांनी शंका व्यक्त केली. तसेच काही लोकांना धनसंचय करण्यासाठी हा प्रस्ताव आणला असल्याचा टोलाही त्यांनी लागवाला; मात्र सीसीटीव्हीचा प्रस्ताव शहरासाठी उपयुक्त असल्याचा दावा राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी केला. 

कोणते कॅमेरे लागणार
मुख्य चौकात, रस्त्यावर हाय डेफीनेशन कॅमेरे ९५४, मैदाने व बाजारपेठांच्या देखरेखीकरीता पीटीझेड कॅमेरे ३९६, धावत्या वाहनांची गती देखरेख करण्यासाठी स्पीडिंग कॅमेरे ८०, खाडी व समुद्रकिनारी देखरेखीसाठी थर्मल कॅमेरे ९ असे एकूण एक हजार ४३९ कॅमेरे बसवले जाणार आहेत.

 


संबंधित बातम्या

Saam TV Live