कुस्तीपटू नवजोत कौरची आशियाई कुस्ती चॅम्पियनशीप स्पर्धेत सुवर्ण पदकाची कमाई

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 3 मार्च 2018

भारतीय महिला कुस्तीपटू नवजोत कौरने आशियाई कुस्ती चॅम्पियनशीप स्पर्धेत सुवर्ण पदकाची कमाई केलीये. ही ऐतिहासिक कामगिरी कऱणारी नवजोत पहिली भारतीय महिला ठरली. किर्गिस्तानमधील बिश्केकमध्ये खेळवण्यात आलेल्या अंतिम लढतीत नवजोतने फ्रीस्टाइल कुस्ती प्रकारात ६४ किलो वजनी गटात जपानच्या मिया इमाईला ९-१ अशा फरकाने लोळवले. 

नवजोतने सुरुवातीपासून सामन्यात मजबूत पकड ठेवली. पहिल्या सेटमध्ये ५ गुण प्राप्त करत तिने भक्कम आघाडी घेतली. दुसर्‍या सेटमध्ये १ गुण मिळवत मियाने कमबॅकचा प्रयत्न केला. पण त्यानंतर आक्रमक खेळ करत नवजोतने ९-१ अशा फरकाने ऐतिहासिक विजयावर शिक्कामोर्तब केला.  

संबंधित बातम्या

Saam TV Live