'कपिल शर्मा'शो मधून सिद्धूची हकालपट्टी...

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 16 फेब्रुवारी 2019

मुंबई : पुलवामातील भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देश शोकाकूल असताना दहशतवाद्यांची आणि पाकिस्तानची पाठराखण करणारे पंजाब सरकारचे मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांची अखेर आज (शनिवार) टीव्हीवरील 'द कपिल शर्मा शो'मधून हकालपट्टी झाली. विनोदवीर कपिल शर्माच्या या कार्यक्रमाचा सिद्धू हेदेखील महत्त्वाचा भाग होते. 

मुंबई : पुलवामातील भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देश शोकाकूल असताना दहशतवाद्यांची आणि पाकिस्तानची पाठराखण करणारे पंजाब सरकारचे मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांची अखेर आज (शनिवार) टीव्हीवरील 'द कपिल शर्मा शो'मधून हकालपट्टी झाली. विनोदवीर कपिल शर्माच्या या कार्यक्रमाचा सिद्धू हेदेखील महत्त्वाचा भाग होते. 

'काही मोजक्‍या लोकांमुळे तुम्ही संपूर्ण देशाला दोष देऊ शकत नाही. पुलवामातील हल्ला भ्याड होता आणि मी त्याचा निषेध करतो', असे विधान सिद्धू यांनी केले होते. त्यांच्या या विधानामुळे नेटिझन्सने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. यापूर्वीही सिद्धू यांनी थेट पाकिस्तानमध्ये एका कार्यक्रमाला हजेरी लावून तिथे गळाभेटी घेतल्यामुळे ते वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनीही सिद्धू यांचा उल्लेख 'शांतिदूत' असा केल्यामुळे त्यांना टीकेला सामोरे जावे लागले होते. 

आता पुलवामा हल्ल्यासंदर्भात असंवेदनशील वक्तव्य करून सिद्धू यांनी पुन्हा स्वत:ला वादाच्या केंद्रस्थानी आणले. भाजपमधून कॉंग्रेसमध्ये दाखल झालेल्या सिद्धू यांना पंजाब सरकारमध्ये मंत्री म्हणून स्थान आहे. तरीही ते 'सोनी'वरील 'द कपिल शर्मा शो'मध्ये काम करतात. आता सलग दोन घटनांमध्ये सिद्धू वादात सापडल्यामुळे 'सोनी'ने त्यांना या कार्यक्रमातून हटविण्याचा निर्णय घेतला असल्याचे सूत्रांनी सांगितले. आता सिद्धू यांच्याऐवजी अर्चना पुरणसिंह यांचा या कार्यक्रमात समावेश होण्याची शक्‍यता आहे. 

यापूर्वीही 'सोनी'ने काही प्रकरणांमध्ये अशीच ठाम भूमिका घेतली होती. महिलांवरील अत्याचाराच्या 'मी टू' प्रकरणात संगीतकार अन्नू मलिक यांच्यावरही आरोप झाले होते. त्यावेळी 'सोनी'च्या एका कार्यक्रमात अन्नू मलिक यांचा समावेश होता. या आरोपांनंतर मलिक यांचीही 'सोनी'ने हकालपट्टी केली होती.

Web Title: Navjot Singh Sidhu for his comments on Pulwama terror attack


संबंधित बातम्या

Saam TV Live