BREAKING | नवाब मलिकांचा अजित पवारांवर गंभीर आरोप, खोट्या स्वाक्षऱ्या मांडल्याचं स्पष्टीकरण

साम टीव्ही न्यूज
शनिवार, 23 नोव्हेंबर 2019

हे सरकार लवकरच कोसळेल, असा दावा राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केला आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी भाजप व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे.देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली असली तरी हे धोक्याने बनवलेले सरकार आहे. राष्ट्रवादीचा एकही आमदार फुटलेला नाही. त्यामुळे या नव्या सरकारला बहुमत सिद्ध करता येणार नाही 

मुंबईः देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली असली तरी हे धोक्याने बनवलेले सरकार आहे. राष्ट्रवादीचा एकही आमदार फुटलेला नाही. त्यामुळे या नव्या सरकारला बहुमत सिद्ध करता येणार नाही, व हे सरकार लवकरच कोसळेल, असा दावा राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केला आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी भाजप व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे.

राष्ट्रवादीचे विधिमंडळातील गटनेते अजित पवार यांनी पक्षातील २२ आमदारांचा एक गट फोडून भाजपाला पाठिंबा दिल्याची चर्चा आहे. अजित पवारांच्या पाठिंब्यावर भाजपाने सरकार स्थापन करण्याचा दावा केला आहे. आज सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही आमदार फुटलेला नाही. हे सरकार बहुमत सिद्ध करताना टिकणार नाही, असा दावा राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.

 

 

राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे सरकार स्थापन होण्याची शक्यता असताना भाजपानं राष्ट्रवादीच्या आमदारांच्या पाठिंब्यावर सरकार स्थापनेचा दावा केला. त्यानंतर शनिवारी सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तिन्ही पक्षांमध्ये सत्तास्थापनेसंदर्भात चर्चा सुरू असतानाच अजित पवारांनी भाजपासोबत जात सगळ्यांनाच अंचबित केलं. राष्ट्रवादीच्या आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र राज्यपालांना दिले आहेत. मात्र, राष्ट्रवादीचा एकही आमदार फुटलेला नाही, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आला आहे.

Web Title :  fadnavis government not prove majority says ncp leader nawab malik
 


संबंधित बातम्या

Saam TV Live