NCPकडून स्पष्ट संकेत, अजित पवारच राष्ट्रवादीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार..   

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 6 एप्रिल 2018

अजितदादा जेव्हा तुम्ही मुख्यमंत्री व्हाल तेव्हा पोलिसांचा गैरवापर करणाऱ्यांना वठणीवर आणा - धनंजय मुंडे 

आगामी विधानसभा निवडणुकीत विरोधकांचा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार निश्चित झालेला नाही. असं असताना राष्ट्रवादीनं मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून अजित पवार असतील याचे स्पष्ट संकेत दिलेत. अजितदादा जेव्हा तुम्ही मुख्यमंत्री व्हाल तेव्हा पोलिसांचा गैरवापर करणाऱ्यांना वठणीवर आणा असं आवाहन राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडेंनी केलंय. सांगलीतल्या तासगावात हल्लाबोलची यात्रेची सभा झाली. यावेळी मुंडेंनी तासगावातल्या पोटनिवडणुकीतल्या झालेल्या राड्याचा संदर्भ देत सत्ताधारी भाजपवर टीका केलीय. आमदार, खासदार पोलिसांचा गैरवापर करीत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय.


संबंधित बातम्या

Saam TV Live