राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना डिस्चार्ज

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 10 मे 2018

प्रकृती अस्वास्थामुळे केईएम रूग्णालयात उपचार घेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. बेहिशेबी मालमत्ता आणि काळा पैसा प्रतिबंधक कायद्याखाली दोन वर्षे तुरूंगात घालवल्यानंतर नुकताच त्यांना जामीन मंजूर झाला होता. जामीन मिळाल्यानंतरही त्यांच्यावर मुंबईतील केईएम रूग्णालयात उपचार सुरू होते. अखेर आज त्यांना रूग्णालयातून सुटी देण्यात आली. रूग्णालयातून ते थेट त्यांच्या सांताक्रूज येथील घरी गेले... भुजबळ यांच्यावर स्वादुपिंडावरील आजारावर उपचार सुरू होते. दरम्यान, आज सकाळी डॉक्टरांच्या पथकाने त्यांची तपासणी केली.

प्रकृती अस्वास्थामुळे केईएम रूग्णालयात उपचार घेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. बेहिशेबी मालमत्ता आणि काळा पैसा प्रतिबंधक कायद्याखाली दोन वर्षे तुरूंगात घालवल्यानंतर नुकताच त्यांना जामीन मंजूर झाला होता. जामीन मिळाल्यानंतरही त्यांच्यावर मुंबईतील केईएम रूग्णालयात उपचार सुरू होते. अखेर आज त्यांना रूग्णालयातून सुटी देण्यात आली. रूग्णालयातून ते थेट त्यांच्या सांताक्रूज येथील घरी गेले... भुजबळ यांच्यावर स्वादुपिंडावरील आजारावर उपचार सुरू होते. दरम्यान, आज सकाळी डॉक्टरांच्या पथकाने त्यांची तपासणी केली. तसेच भुजबळ कुटुंबीयांनी लवकरात लवकर डिस्चार्ज मिळावा अशी विनंतीही रूग्णालय प्रशासनाला केली होती. त्यामुळे भुजबळ यांना डिस्चार्ज देण्याचा निर्णय घेण्यात आला. छगन भुजबळ यांना पोटदुखीचा त्रास होत असल्याने साधारण महिनाभरापूर्वी जे.जे. रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते.


संबंधित बातम्या

Saam TV Live