फुटणाऱ्या आमदारांनी विचार करावा - शरद पवार 

 फुटणाऱ्या आमदारांनी विचार करावा - शरद पवार 

मुंबई : देशात पक्षांतर बंदी कायदा लागू आहे. त्यामुळे फुटणाऱ्या आमदारांनी विचार करावा. फुटून तुम्ही पुन्हा निवडणुकीला उतरला तर शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र येऊन पाडतील, असा थेट दम राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी फुटणाऱ्या आमदारांना दिला.

महाराष्ट्रात सरकार बनविण्यासाठी तिन्ही पक्षांची तयारी झाली होती. सरकार बनविण्यासाठी बहुमताचा आकडा या तिन्ही पक्षांकडे होता. पक्षाच्या चिन्हावर अधिकृतपणे निवडून आलेले सदस्य शिवसेनेचे 56, राष्ट्रवादीचे 54 आणि काँग्रेसचे 46 असे 156 सदस्यांसोबत काही अपक्षांसोबत ही संख्या 170 च्या आसपास जात होती. काल बैठक झाल्यानंतर काही गोष्टींवर चर्चा होणे गरजेचे होते. आज सकाळी सात वाजता एका सहकाऱ्याने कळविले आम्हाला येथे आणण्यात आले. सकाळी साडेसहा वाजता राज्यपाल सर्व कामे सोडून तयार आहेत. आमदारांच्या चुकीच्या सह्यांचे पत्र राज्यपालांना देण्यात आले असून, ही त्यांची फसवणूक आहे, याचे आश्चर्य वाटते, असेही पवारांनी सांगितले.

अजित पवार यांनी भाजपसोबत जाऊन उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर ही पत्रकार परिषद घेऊन शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली. या परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, दिवाकर रावते, मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. तसेच राष्ट्रवादीचे प्रमुख नेते जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील हेही यावेळी उपस्थित होते.

Web Title: NCP Chief Sharad Pawar warning NCP MLAs in Mumbai

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com