राष्ट्रवादी काँग्रेस आपले सगळे पत्ते उघडे करण्याची शक्यता

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 14 फेब्रुवारी 2019

आगामी लोकसभेच्या दृष्टीने मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक पार पडतेय. या बैठकीत, राष्ट्रवादी काँग्रेस आपले सगळे पत्ते उघडे करण्याची शक्यता आहे.

यावेळी उमेदवारांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तबही करण्यात येणार आहे. कालच, अजित पवारांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मुंबईत गुप्त भेट घेत महाआघाडीच्या प्रवेशासंदर्भात जवळपास दीड तास चर्चा केली.

अजित पवार राज ठाकरेंसोबत चालण्यास आग्रही असताना, दुसरीक़डे मात्र काही राष्ट्रवादी नेत्यांनी राज ठाकरेंना विरोध कायम ठेवलाय. त्यामुळे राज ठाकरेंबाबत काय निर्णय होतो याचीच प्रत्येकाला उत्सुकता आहे.

शिवाय, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार माढा लोकसभा लढणार की नाही, याही विषयावर बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, राजधानीत काल शरद पवारांच्या निवासस्थानी काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधींसह विविध विरोधकांनी भेट घेतली होती. त्यामुळे आज मुंबईत पार पडणाऱ्या राष्ट्रवादीच्या बैठकीकडे सर्वच राजकीय पक्षांचं लक्ष आहे. 

दरम्यान राज ठाकरेंना महाआघाडी सहभागी करुन घेण्याकरता, अजित पवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांमध्ये देखील बैठक पार पडली होती... या बैठकीनंतर अशोक चव्हाण राहुल गांधींचीदेखील भेट घेणार आहेत.. 

संबंधित बातम्या

Saam TV Live