अजित पवार सकाळीच घरातून निघाले, कोणाला भेटणार पवार

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 26 नोव्हेंबर 2019


भाजपसोबत सत्तेत सहभागी झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार सहभागी झाल्याने त्यांचे मन वळविण्याचे प्रयत्न राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून सतत करण्यात येत आहेत. जयंत पाटील, सुनील तटकरे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील हे प्रमुख नेते अजित पवारांना भेटत आहेत.

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार आज (मंगळवार) सकाळीच आपल्या निवासस्थानातून निघाले असून, ते थेट ट्रायडंट हॉटेलमध्ये पोहचले आहेत. याठिकाणी ते कोणाला भेटणार आणि काय सुरु आहे, याविषयी विविध तर्कवितर्क लढविले जात आहेत.

भाजपसोबत सत्तेत सहभागी झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार सहभागी झाल्याने त्यांचे मन वळविण्याचे प्रयत्न राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून सतत करण्यात येत आहेत. जयंत पाटील, सुनील तटकरे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील हे प्रमुख नेते अजित पवारांना भेटत आहेत. आज सकाळी अजित पवार आपल्या निवासस्थानातून निघून कार्यकर्त्याच्या गाडीतून ट्रायडंट हॉटेलला पोहचले आहेत. याठिकाणी कोणताही कार्यक्रम नसताना अजित पवार येथे कशासाठी आले आहेत, याबद्दल अंदाज लावले जात आहेत. 

भाजपसोबत गेलेल्या अजित पवार यांची मनधरणी करण्याचे राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून प्रयत्न सोमवारी सलग तिसऱ्या दिवशी सुरुच असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ अजित पवारांच्या भेटीला गेले होते. यांच्यात काहीकाळ चर्चा झाली. पण, अजित पवार आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे सांगण्यात येत आहे.

Web Title: NCP leader Ajit Pawar into Trident hotel at Mumbai
 


संबंधित बातम्या

Saam TV Live