अजित पवारांची मनधरणी सुरुच, 3 तास चर्चा, जयंत पाटलांना यश येणार?

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 24 नोव्हेंबर 2019

मुंबई :  राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील अजित पवारांच्या भेटीला गेले आहेत... तत्पूर्वी जयंत पाटलांनी राजभवनवर हजेरी लावत, 51 आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र कार्यालयात सुपूर्द केलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या यादीत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नावाचाही समावेश आहे. मात्र अजित पवारांच्या नावापुढे त्यांची सही नसल्याची माहिती जयंत पाटलांनी दिली.. तसंच अजित पवारांची मनधरणी करण्याचा प्रयत्न सुरू असून, त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय न झाल्याचंही जयंत पाटलांनी स्पष्ट केलंय.

भाजपसोबत गेलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची मनधरणी करण्याचे राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून प्रयत्न सुरुच असून, आज सकाळी जयंत पाटील आणि दिलीप वळसे पाटील यांनी अजित पवारांची भेट घेतली. 

देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या साथीने काल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप झाला होता. अजित पवारांनी काही आमदारांसह राजभवनात शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादीने आपला याला पाठिंबा नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर अजित पवार यांची विधिमंडळ नेतेपदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यामुळे आता त्यांच्याकडे कोणतेच अधिकार नाहीत. कालपासून अजित पवारांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरु आहेत.

आज सकाळी सुरवातीला दिलीप वळसे पाटील हे अजित पवारांच्या निवासस्थानी पोहचले. त्यानंतर जयंत पाटील याठिकाणी आले. सुमारे दोन तास यांच्यात चर्चा झाली. पण, अजित पवारांचे मन वळविण्यात हे नेते यशस्वी झाले की नाही याबाबत माहिती मिळू शकली नाही. अजित पवार यांच्या मनधरणीबाबतचा सस्पेन्स कायम आहे. काल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची मनधरणी केल्यानंतर आज दिलीप वळसे पाटील यांच्यासह जयंत पाटील यांनी तीन तास चर्चा केली, मनधरणी केली, या तीन तासात काय झालं याचा सस्पेन्स मात्र दोन्ही नेत्यानी ठेवला. या ठिकाणाहून हे दोन्ही नेते राष्ट्रवादीचे आमदार वास्तव्यास असलेल्या रेनसाँ हॉटेलकडे रवाना झाले. याठिकाणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आमदारांच्या भेटीला गेले आहेत. 

Web Title: NCP leader Jayant Patil and Dilip Walse Patil meet Ajit Pawar in Mumbai

संबंधित बातम्या

Saam TV Live