शरद पवारांच्या आज मुंबईत बैठका

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 28 सप्टेंबर 2019

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी काल तडकाफडकी आमदारकीचा राजीनामा दिला. अजित पवार यांनी राजकीय संन्यास घेण्याची भाषा केली आहे. दुसरीकडे शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या नेत्यांच्या बैठका घेण्याची तयारी सुरू केली आहे.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी काल तडकाफडकी आमदारकीचा राजीनामा दिला. अजित पवार यांनी राजकीय संन्यास घेण्याची भाषा केली आहे. दुसरीकडे शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या नेत्यांच्या बैठका घेण्याची तयारी सुरू केली आहे.

मुंबईत राष्ट्रवादीच्या बैठका
अजित पवार यांनी काल आपल्या आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर, ते नॉटरिचेबल आहेत. शरद पवार यांनी काल पत्रकार परिषद घेऊन, त्यांच्या राजीनाम्याविषयी माहिती दिली. राजीनाम्याबाबत माझ्याशी चर्चा झाली नसल्याचे शरद पवार यांनी सांगितले. तसेच अजित पवार यांच्याशी संपर्क होऊ शकला नसल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले होते. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार यांनी राजीनामा दिल्याने, निवडणुकीचे काय?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पण, अजित पवार यांचा राजीनामा आणि त्यानंतरच्या परिस्थितीवर शरद पवार यांनी बैठका घेण्याची तयारी केली आहे. शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक होणार आहे.

शरद पवार मुंबईच्या दिशेने
काल, पुण्यात पत्रकार परिषद घेतल्यानंतर शरद पवार मुंबईला निघून घेल्याचे सांगितले जात होते. पण, पवार काल रात्री पुण्यातील निवासस्थानीच होते. आज, सकाळी ते मुंबईच्या दिशेने रवाना झाली. मिळालेल्या माहितीनुसार पवार मुंबईत राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक घेणार आहेत. तसेच अजित पवारदेखील कालपासून मुंबईतच असून, शरद पवार आणि अजित पवार यांचीही बैठक होण्याची शक्यता आहे. या बैठकीनंतर शरद पवार आणि अजित पवार संयुक्तरित्या माध्यमांशी संवाद साधण्याची शक्यता आहे किंवा शरद पवारच अजित पवारांच्या राजीनाम्यामागची भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे.

Web Title: ncp leader sharad pawar meetings in mumbai ajit pawar parth pawar
 


संबंधित बातम्या

Saam TV Live