राष्ट्रवादीचे आमदार पांडुरंग बरोरा शिवसेनेच्या वाटेवर

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 10 जुलै 2019

मुंबई : शहापूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी आज अखेर आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष  हरिभाऊ बागडे यांच्याकडे दिला. यावेळी बरोरा यांच्यासोबत शिवसेना नेते मंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. पांडुरंग बरोरा उद्या उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळत आहे.

पांडुरंग बरोरा हे शहापुरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. 1980 पासून पवार कुटुंबा सोबत पांडुरंग बरोरा यांचे वडील महादू बरोरा यांचे घनिष्ठ संबंध होते. पवार यांचे कट्टर समर्थक अशी त्यांची ओळख होती. महादू बरोरा हे शहापूर मधून चार वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत.

शहापुरात सहा महिन्यांपूर्वी झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांपासून पांडुरंग बरोरा हे राष्ट्रवादी वर नाराज असल्याचं बोललं जातं आहे. याच दरम्यान ते ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आले. शिंदे यांनी बरोरा यांचं मन वळवल्यानंतर अखेर बरोरा यांनी राष्ट्रवादी सोडण्याचा निर्णय घेतला. एकनाथ शिंदे यांच्या सोबत असलेल्या जवळच्या संबंधांमुळे पांडुरंग बरोरा शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मात्र पांडुरंग बरोरा यांच्या शिवसेना प्रवेशाने शहापूरात राष्ट्रवादीला मोठा धक्का बसल्याचं बोललं जातं आहे.

Web Title: NCP MLA pandurang barora to enter Shivsena

संबंधित बातम्या

Saam TV Live