हवा आपल्या बाजूने; महाराष्ट्रात महाआघाडीला 35 जागा मिळतील - पार्थ पवार

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 24 एप्रिल 2019

खारघर: खारघरमध्ये मंगळवारी एका प्रचारसभेत मावळ लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांनी हवा आपल्या बाजूने असून महाराष्ट्रात आघाडीला 35 जागा मिळतील असे सांगिले.

पार्थ पवार म्हणाले की, लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरु असताना राज्यात झालेल्या पहिल्या टप्याच्या मतदानावरून पंधरा ते सोळा जागा आघाडीला मिळतील असे सांगितले. दुसऱ्या टप्यात आकडा वीस तर तिसऱ्या टप्यात झालेल्या मतदारांनावरून अठ्ठावीस जागा आघाडीला मिळतील असे सांगून चौथ्या टप्यात आघाडीचा हा आकडा पस्तीसपर्यंत जाईल असे सांगितले.

पुढे पार्थ पवार म्हणाले की, पंतप्रधान आणि मुख्यमंत्री हे विकासावर काहीच बोलत नाहीत. देशात दिवसेंदिवस बेरोजगारी वाढत आहे. शेतकऱ्यांच्या अनेक समस्या आहेत. मात्र त्यावर कोणी काहीच बोलत नाही. असे सांगून मावळ हा माझा मतदारसंघ असून निवडून आल्यावर चांगला विकास करणार असल्याचे आश्वसन त्यांनी यावेळी दिले.

पार्थ पवार यांनी मुद्देसूद भाषण केल्याने उपस्थितांमध्ये पार्थ पवार हे चांगले बोलतात अशी चर्चा सुरु होती.  यावेळी राष्ट्रवादीच्या महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ यांनी पंतप्रधान बेटी बचाओचा नारा देतात आणि भाजपचे आमदार बेटी भगाओ असे सांगतात. ही भाजपची संस्कृती असल्याचे सांगून भाजपच्या धोरणावर टीका केली. 

Web Title: marathi news NCP parth pawar on loksabha 2019 kharaghar 

संबंधित बातम्या

Saam TV Live