जयंत पाटील यांचा भाजप निश्चित पराभव करेल- चंद्रकांत पाटील

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 26 जून 2019

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हे सध्या राष्ट्रवादी काँग्रसेच्या नेत्यांच्या मागे लागल्याचे दिसत आहेत. बारामतीत अजित पवार यांचा पराभव करु असा विश्वास व्यक्त केल्यानंतर आता त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याविषयी भाष्य केले आहे. वाळवा विधानसभा मतदारसंघातून जयंत पाटील यांचा भाजप निश्चित पराभव करेल, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे. ते सांगली येथे बोलत होते.

शरद पवार यांचा पश्चिम महाराष्ट्रातील बालेकिल्ला माढा, कोल्हापूर आणि हातकणंगले हे लोकसभा मतदारसंघ युतीने उद्ध्वस्त केले आहेत. आता आगामी विधानसभा निवडणुकीत पवारांच्या बालेकिल्ल्याची निशाणीही ठेवणार नाही, असे त्यांनी म्हटले.

दरम्यान, मंगळवारी पिंपरी येथे बोलताना चंद्रकांत पाटील यांनी राज्यात येत्या १५ सप्टेंबरपासून आचारसंहिता लागू होईल. तसेच १५ ते २० ऑक्टोबर दरम्यान निवडणुका होतील, असे सांगितले होते.

Web Title: ncp president jayant patil will definitely defeat in assembly election 2019 says bjp minister chandrakant patil

संबंधित बातम्या

Saam TV Live