चित्रा वाघ यांच्या नेतृत्वाखाली विनोद तावडे यांना घेराव ; राम कदम यांच्या वक्तव्याचे पडसाद साताऱ्यातही

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 5 सप्टेंबर 2018

गोपळाकाल्यात महिलांविरुद्ध मुक्ताफळं उधळणाऱ्या भाजप प्रवक्ते राम कदम यांच्या वक्तव्याचे पडसाद साताऱ्यातही उमटल्याचं पाहायला मिळालं. राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्या नेतृत्वाखाली महिला कार्यकर्त्यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांना घेराव घातला आणि कदमांच्या वक्तव्यावरुन जाब विचारला.

सर्किट हाऊस परिसरात घेराव घातल्यानंतर तावडेंनी महिला कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेत "हा विषय गृह खात्याचा आहे, मी आपल्या भावना मुख्यमंत्र्यांना कळवतो" असं आश्वासन देत, त्यांच्या तावडीतून सुटका करुन घेतली.

WebTitle : marathi news ncp women wing questions vinod tawade on controversial statement by ram kadam  

संबंधित बातम्या

Saam TV Live