भाजपप्रणित एनडीएने मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यात मारली बाजी

भाजपप्रणित एनडीएने मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यात मारली बाजी

लोकसभा निकाल 2019 : नवी दिल्ली : 'फिर एक बार मोदी सरकार'च्या घोषणा देत प्रचार केलेल्या भाजपप्रणित एनडीएने मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यात आघाडी मारली आहे. मतमोजणीस सुरवात झाल्यानंतर पहिल्या अर्ध्या तासात एनडीएचे उमेदवार १३२ जागांवर आघाडीवर आहेत, तर कॉंग्रेसच्या यूपीएचे उमेदवार ७० जागांवर आघाडीवर आहेत.

मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यात टपाली मतदानाची मोजणी झाली. त्यानंतर ईव्हीएमची पहिली फेरी सुरु झाली आहे.

गेल्या दीड महिन्यापासून देशभरात विविध राजकीय मैदानांवर सुरू असलेल्या निवडणूक सामन्याचा सर्वांत उत्कंठावर्धक क्षण येऊन ठेपला आहे. या सामन्यांमध्ये विजय प्राप्त करून कोण सत्ताकरंडक उंचावणार, हे आज रात्रीपर्यंत स्पष्ट होईल. देशातील प्रत्येक जनतेशी जोडली गेलेली ही निवडणूक आहे. जनतेने आपल्या आणि देशाच्या विकासाची आस मनात ठेवून मतदान केले. जनतेचे मत "न्याय'च्या पारड्यात की "फिर से मोदी सरकार' हे आज स्पष्ट होईल. 

मतदानाचा पहिला टप्पा पार पडला तो 11 एप्रिलला 19 मेपर्यंत सात टप्प्यांत संपूर्ण देशांत ही प्रक्रिया पूर्ण झाली. भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवीत "फिर एक बार मोदी सरकार' असा नारा दिला, तर कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी "न्याय' सरकारचे आश्‍वासन दिले. चौकीदार चोर है, भ्रष्टाचारी नं. 1 पासून खाकी अंडरवेअर, औरंगजेब अशा आरोपांची राळही उडविली गेली. 

कलचाचण्यांनी भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला कौल दिला आहे, जनतेचा खरा कौल आज समजेल. कलचाचण्यांवर विरोधकांनी विश्‍वास न ठेवता आणि भाजपनेही सावध भूमिका घेताना सर्व प्रकारच्या परिस्थितीची शक्‍यता लक्षात घेऊन आपापले डावपेच आखले आहेत. भाजपने जेवणावळीच्या निमित्ताने आपल्या मित्रपक्षांशी संवाद साधत खुंटी बळकट करून घेतली आहे. शिवाय, बिजू जनता दल आणि वायएसआर कॉंग्रेस यांसारखे तगडे प्रादेशिक पक्षही भाजपच्या वळचणीला जाऊ शकतात. कर्नाटकात धर्मनिरपेक्ष जनता दल (जेडीएस) आणि कॉंग्रेस यांच्यात आघाडी झाल्या दिवसापासून धुसफूस सुरू आहे. त्यांच्यातील भांडणे विकोपाला गेली तर ते वेगळा निर्णय घेऊ शकतात. 

543 
लोकसभेच्या एकूण जागा 

542 
निवडणूक झाली 

67 टक्के 
देशातील सरासरी मतदान 

90 कोटी 
एकूण मतदार 

8049 
एकूण उमेदवार 

Web Title: NDA well ahead of UPA in Lok Sabha 2019 Results

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com