दिव्यांश अद्यापही बेपत्ताच; #NDRF आणि अग्निशमन दलाने शोधकार्य थांबवलंय

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 13 जुलै 2019

दोन दिवस उलटून गेले तरीही दिव्यांश अद्यापही बेपत्ताच आहे. 48 तासांनंतर एनडीआरफ आणि अग्नशिमन दलाने शोधकार्यही थांबवलंय. यानंतर दिव्यांशच्या कुटुंबियाचा आक्रोश पाहायला मिळतोय. गोरेगाव पूर्वेकडील दिंडोशी परिसरात बुधवारी रात्री 2 वर्षांचा दिव्यांश गटारात पडला होता. तेव्हापासूनच दिव्यांशचा शोध सुरु होता.

गटारापासून जवळच असलेल्या नाल्यांमध्ये तो वाहून गेल्याची शक्यता व्यक्त करण्यात येतेय. दरम्यान महापौर विश्वनाथ महाडेश्वर या परिसरात येण्यापूर्वीच संतप्त स्थानिकांनी रस्ता अडवून धरला होता. रहिवाशांच्या रोषामुळे महापौरांना पाहणी करुन काढता पाय घ्यावा लागला होता.

गोरेगावच्या दिंडोशीमधील घटनेनंतर मुंबईतील खुले मॅनहोल आणि गटारात पडून 328 नागरिकांनी आपले प्राण गमावल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय.

WebTitle : marathi news NDRF and fire brigade stops search operation of dinvyansh 

संबंधित बातम्या

Saam TV Live