तूर विकण्यासाठी ‘जात’ सांगण्याची गरज काय ?

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 27 फेब्रुवारी 2020

हिंगोली : नाफेडच्या तूर खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांना मालाची विक्री करण्यासाठी दिलेल्या फॉर्ममध्ये जातीचा उल्‍लेख करावा लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांतून संताप व्यक्त केला जात आहे. हमी भावाने तूर खरेदी करण्याचा निर्णय असताना जातीचा उल्लेख कशासाठी ? असा संतप्त सवाल शेतकरी करत आहेत.

हिंगोली : नाफेडच्या तूर खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांना मालाची विक्री करण्यासाठी दिलेल्या फॉर्ममध्ये जातीचा उल्‍लेख करावा लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांतून संताप व्यक्त केला जात आहे. हमी भावाने तूर खरेदी करण्याचा निर्णय असताना जातीचा उल्लेख कशासाठी ? असा संतप्त सवाल शेतकरी करत आहेत.

जिल्ह्यात नाफेड केंद्रामार्फत तूर खरेदी केली जात आहे. या केंद्रावर शेती मालाची विक्री करण्यासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. १५ मार्चपर्यंत नोंदणी केली जाणार आहे. मात्र नोंदणी करताना शेतकऱ्यांची माहिती भरताना फॉर्ममध्ये शेतकऱ्यांना जात विचारली जात आहे. या प्रकाराने शेतकरी चांगलेच गोंधळून जात आहेत.

नामदेव पतंगे यांची तक्रार

विशेष म्हणजे मोठ्या कष्टाने पिकविलेल्या शेती मालाच्या विक्रीसाठी प्रवर्गनिहाय वर्गीकरण नेमके कशासाठी? असा प्रश्न शेतकऱ्यांतून उपस्थित केला जात आहे. स्वानिमानी शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे यांनी तहसीलदाराला या बाबत निवेदन दिले आहे.
नोंदणीच्या रकाण्यात ऑदर बॅकवर्ड क्लासेस, शेड्युल कास्ट, शेड्युल ट्राईब, जनरल आणि इतर असा उलेख करण्यात आलेला आहे.

जातीचा उल्‍लेख कशासाठी?

नोंदणीसाठी एकूण जातपैकी तुमची जात कोणत्या फॉरमॅटमध्ये बसतेय याची थेट विचारणा करूनच पुढे नोंदणी होत आहे. सर्वच शेतकऱ्यांच्या शेतीमालाला एकच दर निश्चित केलेला असताना आता जातीचा उल्‍लेख कशासाठी? अशी शेतकऱ्यांतून चर्चा होत आहे.

सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन

हिंगोली : तालुक्‍यातील कोथळज येथील हरिओम शिक्षण संस्‍था व युवा सेनेच्या पुढाकाराने मे महिन्यात (ता. २५) सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन औंढा तालुक्‍यातील येळीफाटा येथे करण्यात आले आहे.

येळीफाटा सोहळा

कोथळज येथील हरिओम कृषी शिक्षण विकास संस्था व युवा सेनेच्या वतीने सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन दरवर्षी करण्यात येते. या वर्षीदेखील हा उपक्रम मे महिन्यात (ता. २५) औंढा तालुक्‍यातील येळीफाटा येथील लॉन्स मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. हिंगोली जिल्ह्यात पडत असलेल्या सततच्या दुष्काळाने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. विवाह सोहळ्यासाठी मोठा खर्च होतो.

नाव नोंदणी करण्याचे आवाहन

त्यामुळे शेतकऱ्याला मदतीचा हात म्हणून सोहळ्यात लग्न पार पाडावे. सोहळ्याचा सर्व खर्च हरिओम कृषी शिक्षण विकास संस्था व युवा सेनेच्या वतीने केला जाणार आहे. शेतकऱ्यानी नाव नोंदणी करणे गरजेचे असून नाव नोंदणी करण्याचे आवाहन युवा सेना जिल्‍हा प्रमुख दिलीप घुगे यांनी केले आहे. ही नाव नोंदणी हिंगोली येथील समर्थ महाविद्यालय व येळीफाटा येथील मंगल कार्यालयात सुरू आहे. 

Web Title Need To Say 'caste' To Sell Truffles


संबंधित बातम्या

Saam TV Live