कोरोनाबाबत हलगर्जीपणा दिसल्यास करा थेट हायकोर्टात तक्रार

साम टीव्ही
शनिवार, 1 ऑगस्ट 2020
  • कोरोनाबाबत हलगर्जीपणा, करा थेट हायकोर्टात तक्रार
  • कोर्टच करणार आता हलगर्जीपणा करणाऱ्यांचा इलाज
  • रुग्णलुटीच्या, हलगर्जीपणाच्या तक्रारींची कोर्टाकडून दखल

कोरोनाच्या संकटात रुग्णलुटीचे आणि रुग्णांच्या हलगर्जीपणाचे अनेक प्रकार समोर आले. अशात रुग्णालयाकडून, प्रशासनाकडून अन्याय झाल्यास दाद कुणाकडे मागायची असा प्रश्न निर्माण होतो. यावर आता कोर्टानंच रुग्णांना मदतीचा हात दिलाय. काय घडलंय असं. पाहा...

कोरोनाच्या संकटात अनेक रुग्णालयांकडून कोरोना रुग्णांबाबत हलगर्जीपणा होताना पाहयला मिळतोय. अनेकांना व्हेंटीलेटर मिळत नाही. अनेक खासगी रुग्णालयं लाखोंची बिलं आकारताहेत. तर अनेक रुग्णालयात बेड असुनही बेड नसल्याचं कारण रुग्णांना दिलं जातंय. अशात दाद मागायची तरी कुणाकडे असा प्रश्न रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांपुढे निर्माण झालाय. हेच पाहता स्वत: उच्च न्यायालय रुग्णांच्या मदतीसाठी धावून आलंय आणि हलगर्जीपणा करणाऱ्यांचा ईलाज करण्याचा विडा उचललाय.

याबाबतच्या तक्रारी थेट उच्च न्यायालयाकडे करा!

01. कंटेन्मेंट झोनमध्ये जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा न होणे

02. स्वस्त धान्य दुकानात कार्डधारकांना धान्य न मिळणे

03. कोरोनाग्रस्तांना रुग्णालयात दाखल होण्यासाठी मदत केंद्र न मिळणे

04. रुग्णालयात दाखल करताना जबाबदार अधिकाऱ्यांनी सहकार्य न करणे

05. अधिकाऱ्यांच्या निर्देशानंतरही रुग्णालयानं रुग्णाला दाखल न करणे

06. रुग्णांवर उपचार न होणे, रुग्णालयानं पुरवलेल्या वा रुग्णांनी आणलेल्या औषधांचा वापर रुग्णांवर न होणे

याबाबत तक्रार करत असताना तक्रारदारानं नोटरीसमोर लिहलेलं शपथपत्र जोडावं असं कोर्टानं सांगितलंय..

कोरोना संकटात प्रत्यक्ष प्रशासनाकडे तक्रार करुनही उपयोग होत असल्याचा अनुभव नागरिकांना आहे...यात वेळही भरपूर जातो..हेच पाहता आता उच्च न्यायालयानं रुग्णांना मदतीचा हात दिलाय...त्यामुळं कोरोना महामारीतही रुग्णांना एक दिलासा मिळालाय...कोर्टाचं हे पाऊल खरंच कौतुकास्पदच आहे.


संबंधित बातम्या

Saam TV Live