अभिनेत्री नेहा पेंडसेला भाजप कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केल्याचा व्हिडिओ व्हायरल 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 5 सप्टेंबर 2018

एकीकडे भाजप आमदार राम कदम यांनी महिलांविषयी बेताल वक्तव्य केलं असतानाच बुलडाण्यातही एक संतापजनक प्रकार समोर आलाय. मालिका आणि चित्रपटात गाजलेली अभिनेत्री नेहा पेंडसेला भाजप कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केल्याची घटना घडलीय.

बुलडाणा जिल्ह्यातल्या चिखलीमध्ये अभिनेत्री नेहा पेंडसेला भाजपच्या दहीहंडी कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. यावेळी नेहा स्टेजवर चढत असताना भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी तिला धक्काबुक्की केली.या प्रकारामुळे नेहाचा संताप अनावर झाला. धक्काबुक्कीनंतरचा एक व्हिडिओ समोर आला असून त्यात नेहा प्रचंड चिडलेली दिसतेय.

एक महिला पदाधिकारी नेहाशी बोलण्याचा प्रयत्न करत असताना, नेहानं मात्र संतापून तिच्यासमोर हात जोडल्याचंही व्हिडिओमध्ये दिसतंय. नेहाने या प्रकरणी आयोजकांना सुनावलं आणि रागारागात ती निघून गेली. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live