नेपाळमध्ये आतापर्यंत पुरात तब्बल २० लोकांनी गमावला जीव ; नेपाळमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 13 जुलै 2019

नेपाळमध्ये आलेल्या पुरात तब्बल २० लोकांचा जीव गेलाय. तर कित्येक लोक बेपत्ता झाल्याचं कळतंय. तब्बल ३० लाख लोकांना या पुराचा फटका बसलाय.

मुसळधार पावसानं नेपाळची राजधानी काठमांडूसह अन्य जिल्ह्यांनाही पुराचा जबरदस्त फटका बसलाय. नेपाळमधील 77 जिल्ह्यांमध्ये पुरानं थैमान घातलंय. नेपाळमधल्या पुराचे अनेक धक्कादायक व्हिडीओ आता समोर येताहेत.

अनेक ठिकाणी घरं पडून तर अनेक ठिकाणी दरडी कोसळून अनेकजण जखमी झालेत. काठमांडुत एका घराखाली दबून अख्खं कुटुंब दगावल्याचं कळतंय. पोलिस प्रशासनानासह आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून लोकांची सुटका केली जातेय. अनेक नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलंय.

प्रशासनाच्या सांगण्यानुसार कोसी नदीला आलेल्या पुरामुळे हे थैमान माजलंय. संपूर्ण आठवडा नेपाळमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिलाय. त्यामुळं नागरिकांची चिंता वाढलीय.

WebTitle : marathi news nepal floods twenty people lost lives heavy rainfall foretasted by weather department 

संबंधित बातम्या

Saam TV Live