राणीच्या बागेत फेब्रुवारीत आणखी १० नवे प्राणी दाखल होणार 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

मुंबई - पेंग्विनच्या आगमनानंतर भायखळा येथील जिजामाता प्राणिसंग्रहालयातील पर्यटकांची संख्या वाढली आहे. येत्या फेब्रुवारीत आणखी १० नवे प्राणी दाखल होणार आहेत.

मुंबई - पेंग्विनच्या आगमनानंतर भायखळा येथील जिजामाता प्राणिसंग्रहालयातील पर्यटकांची संख्या वाढली आहे. येत्या फेब्रुवारीत आणखी १० नवे प्राणी दाखल होणार आहेत.

मद्रास तलाव कासव, अस्वल, लांडगे, तरस, बिबट्या, मांजर, सरपटणारे प्राणी, विविध प्रकारचे पक्षी फेब्रुवारीत जिजामाता उद्यानाची शोभा वाढवण्यासाठी येणार आहेत. उद्यानात सध्या ४२९ प्राणी आहेत. तब्बल ५३ एकरांवर पसरलेल्या या प्राणिसंग्रहालयाच्या विस्तारासाठी शेजारील सात एकरांचा भूखंड नुकताच मिळाला आहे. प्राणिसंग्रहालयाच्या नूतनीकरणासाठी १५० कोटींचा निधी मिळाला आहे, अशी माहिती जिजामाता उद्यानाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी दिली.

WebTitle : marathi news new animals to arrive in ranichi baug in February 

संबंधित बातम्या

Saam TV Live