माजी सैनिकांचं राष्ट्रपतींना पत्र, Modi सैनिकांचं राजकारण करत असल्याचा पत्रात उल्लेख

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 12 एप्रिल 2019

नवी दिल्ली - लोकसभा निवडणूकांची धामधुम सध्या जोरात आहे. या दरम्यान होणाऱ्या प्रचारसभांमध्ये अनेकदा लष्कराचा उल्लेख होता. या पार्श्वभूमिवर आठ मजी लष्कर प्रमुखांनी आणि 100 पेक्षा जास्त माजी जवानांनी आपल्या स्वाक्षऱ्या करुन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहिले आहे. यामध्ये राजकारणासाठी लष्कराचा वापर थांबवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

नवी दिल्ली - लोकसभा निवडणूकांची धामधुम सध्या जोरात आहे. या दरम्यान होणाऱ्या प्रचारसभांमध्ये अनेकदा लष्कराचा उल्लेख होता. या पार्श्वभूमिवर आठ मजी लष्कर प्रमुखांनी आणि 100 पेक्षा जास्त माजी जवानांनी आपल्या स्वाक्षऱ्या करुन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहिले आहे. यामध्ये राजकारणासाठी लष्कराचा वापर थांबवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

लष्कराच्या कोणत्याही मोहिमेचा, कोणत्याही राजकारणी पक्षाकडून प्रचारासाठी उपयोग केला जाऊ नये यासाठी स्षष्ट आदेश देण्यात यावे अशी मागणी रामनाथ कोविंद यांना माजी सेना प्रमुखांनी पत्राद्वारे केली आहे. परंतु, यामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाचा नाव घेऊन उल्लेख करण्यात आलेला नाही.

लोकसभा निवडणूकांच्या पार्शवभूमिवर अनेक ठिकाणी प्रचारासाठी लष्कराच्या मोहिमेचा उल्लेख असलेले पोस्टर आणि ब्रनर्स बघायला मिळत होते. त्यानंतर निवडणूक आयोगाने हस्तक्षेप करत ही सर्व पोस्टर्स आणि बॅनर काढण्याचे आदेय़ दिले. याच पार्शवभूमिवर राष्ट्रपतींना असे पत्र लिहिण्यात आले आहे. 

राष्टपतींना लिहिण्यात आलेल्या पत्रामध्ये, जनरल एसएफ रॉड्रिग्ज, जनरल शंकर रॉय चौधरी, जनरल दीपक कपूर, एडमिरल लक्ष्मीनारायण रामदास, एडमिरल विष्णु भागवत, एडमिरल अरुण प्रकाश, एडमिरल सुरेश मेहता आणिचीफ मार्शल एनसी सूरी यांच्यासारख्या मोठ्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या सर्वांनिच देशाच्या सेनेच्या सेक्युलर मुल्यांचे संरक्षण व्हावे अशी विनंत राष्ट्रपतींना केली आहे. 

दरम्यान, पत्रात कोणत्याही पक्षाचा उल्लेख केला गेला नसला तरी, मंगळवारी 9 एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभेत पुलवामा हल्ल्याचा उल्लेख केला होता. पहिल्यांदाच मतदान करणाऱ्यांना आपले मत त्यांनी पुलवा हल्ल्यातील हुतात्मा झालेल्या जवानांना आणि एअर स्ट्राईक करणाऱ्या लष्कराला समर्पित करण्यातचे आवाहन मोदींनी केले होता. तसेच उत्तर प्रदेशमध्ये मुख्यंमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देखील लष्कराचा उल्लेख 'मोदीजी की सेना' असा केला होता. 

Web Title: 8 ex service chiefs write to President say military being used for votes


संबंधित बातम्या

Saam TV Live