'यूएई' ने दिले जैशेच्या दहशतवाद्याला भारताच्या ताब्यात

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 3 एप्रिल 2019

नवी दिल्ली - डिसेंबर 2017 मध्ये सीआरपीएफच्या जम्मू-काश्मीरमधील लीथपोरा येथील तळावर दहशतवादी हल्ला झाला होता. जैशे महंमदचा निसार अहमद तांत्रे या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार होता. संयुक्त अरब अमिरातीने निसारला भारताच्या स्वाधीन केले आहे. निसार याला रविवारी विशेष विमानाने दिल्लीला आणणण्यात आले. तिथून त्याला राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या ताब्यात देण्यात आले. 

2017 मध्ये झालेल्या या हल्ल्यात सीआरपीएफचे पाच जवान हुतात्मा झाले होते. तर जैशच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. निसार अहमद जैशचा दक्षिण काश्मीरमधील विभागीय प्रमुख नूर तांत्रेचा भाऊ आहे. 

काश्मीर खोऱ्यात जैशला पाय रोऊ देण्यात नूर तांत्रेने महत्वाची भूमिका बजावली डिसेंबर 2017 मध्ये चकमकीत त्याचा खात्मा झाला. एनआयए न्यायालयाने निसार अहमद विरोधात अटक वॉरंट जारी केले होते. मागच्या काही वर्षात संयुक्त अरब अमिरातीने देशात गुन्हे करुन फरार झालेले आरोपी, दहशतवादी यांना पुन्हा भारताकडे सोपवले आहे.

Web Title: India gets custody of 2017 CRPF camp attack plotter from UAE

संबंधित बातम्या

Saam TV Live