'अभिनंदन' शब्दाचा अर्थ आता बदलला : नरेंद्र मोदी

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 2 मार्च 2019

नवी दिल्ली - अभिनंदन हा शब्द आपण आतापर्यंत स्वागतासाठी वापरत होतो, पण आता अभिनंदन या शब्दाचा अर्थ बदलला आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

नवी दिल्ली - अभिनंदन हा शब्द आपण आतापर्यंत स्वागतासाठी वापरत होतो, पण आता अभिनंदन या शब्दाचा अर्थ बदलला आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

भारतमातेचे वायुसेनानी विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी मातृभूमीवर पाऊल ठेवले अन्‌ देशात एकच जल्लोष झाला. आपल्या लाडक्‍या सैनिकाची सुखरूप सुटका व्हावी म्हणून मागील दोन दिवसांपासून मंदिर, मशीद, चर्च अन्‌ गुरुद्वारांमध्ये देवाचा धावा करणाऱ्या जनसागराने देशभर फटाके फुटले, उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत अवघा देश 'अभिनंदन'मय झाल्याचे पाहायला मिळाले. देशभरातील नेत्यांनी त्यांचे पुन्हा भारतात स्वागत केले. पंतप्रधान मोदींनीही अभिनंदन यांचे स्वागत करत, त्यांचा अभिमान असल्याचे म्हटले आहे. विज्ञान भवनात झालेल्या कार्यक्रमात मोदींनी याविषयी वक्तव्य केले.

मोदी म्हणाले, की भारताची ताकद आहे की तो शब्दकोशातील शब्दांचे अर्थ बदलू शकतो. तसेच काही आता होणार आहे. अभिनंदन या शब्दाचा अर्थ स्वागत असे होतो. पण, आता अभिनंदन या शब्दाचा अर्थ बदलणार आहे. भारत जे काही करतो, ते आता जग मोठ्या उत्सुकतेने पाहत आहे. 

Web Title: Meaning of Abhinandan will change now, says PM Narendra Modi


संबंधित बातम्या

Saam TV Live