नरेंद्र मोदी हे पंतप्रधान आहेत आणि निवडणुकीनंतरही तेच पंतप्रधान असतील : गडकरी

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 1 मार्च 2019

नवी दिल्लीः मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (आरएसएस) माणूस असून देशसेवा हे माझे कर्तव्य आहे. नरेंद्र मोदी हे पंतप्रधान आहेत आणि निवडणुकीनंतरही तेच पंतप्रधान असतील, त्यामुळी मी पंतप्रधान पदाच्या शर्यतीत नाही, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज (शुक्रवार) स्पष्ट केले.

'इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह 2019' या कार्यक्रमात बोलताना गडकरी म्हणाले, 'मामि गंगा या अभियानामुळे गंगा नदीच्या पाण्याचा प्रवाह वाढला आहे. पुढील 23 महिन्यात गंगा नदी स्वच्छ होईल. मोदी सरकारच्या काळातच हे झाले आहे. मोदी सरकारच्या काळात रस्त्यांची कामे वेगाने आणि मोठ्या प्रमाणात झाली आहेत. केंद्र सरकारने शेती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. शेती आणि ऊर्जा क्षेत्रात विविधीकरण करणे गरजेचे आहे. देशात रोजगार निर्मितीला पोषक वातावरण आहे. पण, मला असे वाटते की, लोकांनी नोकरी मागण्यापेक्षा नोकरी देण्या इतपत सक्षम झाले पाहिजे.'

'काँग्रेसचे नेते माझे शत्रू नाहीत. आमची राजकीय विचारधारा वेगळी असली तरी त्या पक्षात माझे चांगले मित्र आहेत. विरोधी पक्षांमध्येही माझे अनेकजण चांगले मित्र आहेत,' असेही गडकरी म्हणाले.

Web Title: Nitin Gadkari says Not in race for PMs post

संबंधित बातम्या

Saam TV Live