OIC मध्ये विशेष अतिथी म्हणून सुषमा स्वराज यांची उपस्थिती

OIC मध्ये विशेष अतिथी म्हणून सुषमा स्वराज यांची उपस्थिती

नवी दिल्ली : मुस्लिमबहुल देशांची प्रभावी संघटना असलेल्या 'ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक को-ऑपरेशन'च्या (ओआयसी) अबुधाबी येथे होणाऱ्या परिषदेच्या उद्‌घाटनाच्या सत्रासाठी भारताला निमंत्रित करण्यात आले आहे. परराष्ट्र मंत्र्यांच्या या बैठकीला भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज विशेष अतिथी म्हणून उपस्थित होत्या. 

यावेळी भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा यांनी आपण येथे एका शांतताप्रिय, बुद्धिमान आणि जगातिल विविध धर्मांचा सन्मान करणाऱ्या देशाच्या प्रतिनिधी म्हणून उपस्थित आहेत असे सांगितले. तसेच यावेळी पाकिस्तानचे नाव न घेता, स्वराज यांनी दहशतवादावरुद्धची लढाई सगळ्यांनी मिळून लढावी लागणार असल्याचेही बोलताना नमूद केले. या परिषदेचा उद्देश सर्वांची प्रगती हा आहे, त्यामुळे मी येथे उपस्थित आहे असेही त्या म्हणाल्या. भारतात मुस्लिमांसह अनेक धर्माचे लोक राहतात. तसेच ते गुण्यागोविंदाने नांदत आहे. हे भारताचे वैशिष्ट्य असल्याचेही स्वराज यावेळी बोलताना म्हणाल्या. 

2019 हे वर्ष विशेष असून, ओआयसी हे सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करत आहे. संयुक्त अरब अमिराती हे वर्ष सहिष्णुता वर्ष म्हणून साजरे करत आहे. तर भारत यावर्षी महात्मा गांधी यांची 150 वी जयंती साजरी करत आहे, जे जगासाठी अहिंसेचे प्रतिक आहेत. त्यामुळे यावर्षी या परिषदेला मी येथे उपस्थित आहे याचा मला अभिमान असल्याचेही त्या म्हणाला.   

दरम्यान, (ओआयसी) परिषदेला भारताला निमंत्रण दिल्याने पाकिस्तानने या परिषदेवर बहिष्कार टाकला आहे. 

Web Title: sushma swaraj speaks at OIC meet

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com