अभिनंदन यांच्या परतीच्या पार्श्वभूमीवर वाघा बॉर्डरवरचा 'बीटिंग द रिट्रीट' सोहळा रद्द, प्रसार माध्यमांनाही नो एन्ट्री

अभिनंदन यांच्या परतीच्या पार्श्वभूमीवर वाघा बॉर्डरवरचा 'बीटिंग द रिट्रीट' सोहळा रद्द, प्रसार माध्यमांनाही नो एन्ट्री

नवी दिल्ली - पाकिस्तान विंग कमांडर अभिनंदन यांची आज सुटका करणार आगे. पाक सैनिकांसह ते ईस्लामाबाहून लाहोरकडे येणास रवाना झाले आहेत. साधारण चारच्या सुमारास त्याना भारताकडे सूपूर्द करण्यात येईल असा अंदाज आहे. वाघा बॉर्डरमार्गे भारताकडे सुपूर्द करण्यात येईल. त्यांच्या सूटकेची वेळ निश्चित नसली तरी, वाघा बॉर्डरमार्गे त्यांना भारतात आणलं जाईल. 'बीटिंग द रिट्रीट'च्या वेळी अभिनंदन यांना भारताकडे सुपूर्द केले जाण्याची शक्यता आहे. परंतु, आजचा बीटिंग द रिट्रीट सोहळा रद्द करण्यात आला आहे. तसेच प्रसारमाध्यमांना आणि सामान्य नागरिकांना येथे जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. 

'बीटिंग द रिट्रीट' म्हणजे काय?
वाघा बॉर्डरवर रोज सायंकाळी दोन्ही देशाचे झेंडे उतरवले जातात. यावेळी दोन्ही देशातील पर्यटक मोठ्या प्रमाणात उपस्थित असतात. त्यावेळी दोन्हीकडचे जवान अतिशय उत्साहात बॉर्डरपर्यंत मार्च करतात. मानवंदना देऊन आपले राष्ट्रध्वज खाली उतरवतात.

रिट्रिट म्हणजे थांबा/मागे फिरा. रिट्रिट हा युद्धातला शब्द आहे. युद्धाच्या काळात सूर्यास्तावेळी आपल्या सैनिकांना युद्ध थांबवण्यासाठी दिला जाणारा संकेत म्हणजे रिट्रिट. बिगुल वाजवून हा संकेत दिला जात असे. पण कालांतराने त्यात बदल होते गेले. जसे ड्रम्स आणि बिगुल वाजवून संकेत दिले गेले.

Web Title: Today's 'Beating the Retreat' ceremony of Wagha Border will be canceled

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com