Loksabha 2019 :भाजपमधून ४ विद्यमान खासदारांचा पत्ता कट

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 23 मार्च 2019

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने महाराष्ट्रातील दुसरी यादी जाहीर करताना चार विद्यमान खासदारांचे तिकीट कापत त्यांना नारळ दिला आहे. भाजपने महाराष्ट्रातील पहिल्या यादीतही काही खासदारांना पुन्हा संधी दिली नव्हती.

भाजपने शुक्रवारी मध्यरात्री महाराष्ट्रातील उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. या यादीत पुण्याचे विद्यमान खासदार अनिल शिरोळे, सोलापूरचे खासदार शरद बनसोडे, दिंडोरीचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण आणि जळगावचे खासदार ए. टी. नाना पाटील यांना उमेदवारी देण्यात आलेली नाही. त्याऐवजी पक्षाने पुण्यातून पालकमंत्री गिरीश बापट, दिंडोरी या राखीव मतदारसंघातून डॉ. भारती पवार, जळगावमधून स्मिता वाघ आणि सोलापूरमधून जयसिद्धेश्वर स्वामी यांना उमेदवारी दिली आहे. 

भाजपने या उमेदवारांबरोबरच बारामतीतून राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात रासपचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना उमेदवारी दिली आहे. तर, नांदेडमधून प्रताप चिखलीकर यांना संधी दिली आहे.

Web Title: BJP not given tickets to 4 sitting MPs in Loksabha election

संबंधित बातम्या

Saam TV Live