कॉंग्रेसकडून सातवी यादी जाहीर, यादीत महाराष्ट्रातील पाच उमेदवारांची घोषणा

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 23 मार्च 2019

नवी दिल्ली : काँग्रेसने शुक्रवारी मध्यरात्री आपली सातवी यादी जाहीर करताना या यादीत महाराष्ट्रातील पाच उमेदवारांची घोषणा केली.

नवी दिल्ली : काँग्रेसने शुक्रवारी मध्यरात्री आपली सातवी यादी जाहीर करताना या यादीत महाराष्ट्रातील पाच उमेदवारांची घोषणा केली.

औरंगाबामधून लोकसभेची उमेदवारी विधान परिषदेचे आमदार सुभाष झांबड यांना दिली आहे. तेथे त्यांचा सामना शिवसेनेचे उमेदवार विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे यांच्या विरोधात ते लढतील. भिवंडीतून सुरेश तावरे, लातूरमधून मच्छिंद्र कामत, चंद्रपूरमधून विनायक बांगडे, जालन्यातून विजय केशवराव औताडे यांना उमेदवारी दिली आहे. पुणे, हिंगोली आणि नांदेड यासह इतर काही प्रमुख मतदारसंघातील उमेदवार पक्षाने अद्याप जाहीर केलेले नाहीत.  

काँग्रेस पक्षातर्फे अखेर औरंगाबाद आणि जालना या दोन लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत . औरंगाबाद लोकसभेसाठी सुभाष झांबड, तर जालना लोकसभा मतदारसंघासाठी विलास औताडे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. या दोघांना चार चार टर्म सलग खासदार म्हणून निवडून आलेल्या शिवसेनेचे  चंद्रकांत खैरे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा सामना करावयाचा आहे. सुभाष झांबड हे सध्या औरंगाबाद - जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे आमदार असून त्यांची विधान परिषद सदस्यत्वाची मुदत चालू वर्षात  ऑगस्ट महिन्यात संपते. सुभाष झांबड  औरंगाबाद जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अब्दुल सत्तार  यांच्या अतिशय जवळचे सहकारी आहेत. आणि अब्दुल सत्तार हे अशोक चव्हाण यांचे अतिशय विश्वासातील अनुयायी आहेत . त्यामुळे सुभाष झांबड यांना उमेदवारीच्या शर्यतीत कल्याण काळे आणि प्रा. बनसोड यांच्यावर मात करता आली आहे . 

Web Title: Congress declares loksabha candidate list in Maharashtra


संबंधित बातम्या

Saam TV Live