राहुल गांधी हेच पक्षाध्यक्षपदी कायम राहतील ?

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 13 जून 2019

नवी दिल्ली : काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्यानंतर राहुल गांधी यांच्या उदासीनतेच्या पार्श्‍वभूमीवर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी बुधवारी अनौपचारिक बैठक घेऊन आगामी विधानसभा निवडणुकांच्या तयारीवर चर्चा केली. मात्र, राहुल गांधी हेच पक्षाध्यक्षपदी कायम राहतील, असेही पक्षाने स्पष्ट केले.

लोकसभा निवडणुकीच्या काळात निर्णयप्रक्रियेसाठी नेमलेल्या कोअर ग्रुपमधील नेत्यांची ही बैठक होती. ज्येष्ठ नेते ए. के. अँटनी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत मल्लिकार्जुन खर्गे, संघटना सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, गुलाम नबी आझाद, अहमद पटेल, पी. चिदंबरम, जयराम रमेश आणि रणदीप सुरजेवाला सहभागी झाले होते. अर्थात, पक्षात कोणताही कोअर ग्रुप अस्तित्वात नसून निवडणुकीशी संबंधित सर्व समित्यांचे अस्तित्व संपुष्टात आले आहे.

आजची बैठक पूर्णतः अनौपचारिक स्वरूपाची होती, असे सुरजेवाला यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. आज लोकसभा निवडणूक निकालांचा आढावा आणि महाराष्ट्र, हरियाना, झारखंड; तसेच जम्मू-काश्‍मीर विधानसभांच्या निवडणूक तयारीची चर्चा केली. याच मुद्द्यांवर सर्व सरचिटणीस आणि प्रभारींची मंथन बैठक लवकरच होणार असल्याचे वेणुगोपाल यांनी बैठकीतील नेत्यांना सांगितले. 

राहुल हेच पक्षाध्यक्ष आहेत आणि राहतील. या पदासाठी अन्य कोणत्याही पर्यायांचा विचार करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. 
- रणदीप सुरजेवाला, कॉंग्रेस नेते

Web Title: Congress is preparing for the Assembly elections; Rahul Gandhi continue as party president

संबंधित बातम्या

Saam TV Live