'२०१९ च्या निवडणुकीत मोदींचा पराभव निश्चित' - राहुल गांधी

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 4 मे 2019

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या सात टप्प्यातील अर्ध्याहून जास्त निवडणुका पार पडल्या असून, आतापर्यंतच्या आकडेवारीवरून मोदी सरकारचा पराभव होत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. यंदाच्या निवडणुकीत बेरोजगारी हाच मुख्य मुद्दा असल्याचे, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या सात टप्प्यातील अर्ध्याहून जास्त निवडणुका पार पडल्या असून, आतापर्यंतच्या आकडेवारीवरून मोदी सरकारचा पराभव होत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. यंदाच्या निवडणुकीत बेरोजगारी हाच मुख्य मुद्दा असल्याचे, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (शनिवार) पत्रकार परिषद घेत मोदी सरकारच्या पराभव होत असल्याचा दावा केला. राहुल गांधी यांनी बेरोजगारीसह शेतकरी, उद्योगधंदे अडचणीत असल्याने मोदींना लक्ष्य केले. मोदी या विषयांवर काहीच बोलत नसल्याचे राहुल यांनी म्हटले आहे. या विषयांवर मोदींनी माझ्यासोबत 10 मिनिटे चर्चा करावी, फक्त अनिल अंबानींच्या घरी नाही, असेही राहुल यांनी आव्हान दिले.

राहुल गांधी म्हणाले, ''आमचे पहिले लक्ष्य भाजप आणि नरेंद्र मोदींना पराभव करण्याचे आहे. आम्हाला देशातील संस्था वाचवायच्या आहेत. भाजपचा पराभव होणार हे निश्चित आहे. बेरोजगारी हा देशासमोरील सर्वांत मोठा प्रश्न आहे. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात पहिला मुद्दा रोजगारी संदर्भात आहे. मोदी याविषयी शब्दही बोलत नाहीत, त्यांच्याजवळ कोणता मुद्दाच नाही. आज देशात कोठेही चौकीदार बोलले की चोर है असा शब्द येतो. मोदींना वाटते ते पराभूत होत आहेत, तसे ते नवे मुद्दे आणतात. गुजरातमध्ये त्यांनी सी प्लेन आणले होते. आता त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे, ते पराभूत होत आहेत.'' 

लष्कर ही मोदींची खासगी संपत्ती नाही. सर्जिकल स्ट्राईक हे लष्कराने केले आहेत. काँग्रेसने केलेले सर्जिकल स्ट्राईकला मोदी व्हिडिओ गेम म्हणत असतील तर ते भारतीय लष्काराचा अपमान करत आहेत. मसूद अजहरला पाकिस्तानमध्ये कोणी पाठविले हे सांगावे. न्याय योजनेमुळे गरिबांच्या खात्यात थेट पैसे जमा होणार आहेत. अनेक बेरोजगारांना आम्ही रोजगार देणार आहोत. युवकांना उद्योग सुरु करण्यासाठी तीन वर्षे कोणत्याही परवानगीची गरज नाही. सर्वोच्च न्यायालयात राफेलचा मुद्दा सुरु असल्याने मी याविषयावर भाष्य केल्याने माफी मागितली. चौकीदार चोर है हा आमचा नारा आहे, असेही राहुल गांधी यांनी सांगितले.

Web Title: Congress president Rahul Gandhi says BJP loss in Loksabha election


संबंधित बातम्या

Saam TV Live